सिंधुदुर्ग जिल्हा रहिवाशी सेवाभावी संस्था दिवा शहर महाराजांची प्रतिमा देऊन सन्मानित..
अमित जाधव - संपादक
सिंधुदुर्ग जिल्हा रहिवाशी सेवाभावी संस्था दिवा शहर च्या वतीने शिवव्याख्यान तसेच गडकिल्ले बांधणी स्पर्धेच्या आयोजकांचा महाराजांची प्रतिमा देऊन जाहीर सत्कार व आभार व्यक्त करण्यात आले ..
भाजपा नवनिर्वाचित महिला अध्यक्षा सौ सपना रोशन भगत आयोजित शिवव्याख्यान तसेच गड किल्ले बांधणी स्पर्धा 2023 च्या बक्षीस वितरण समारंभात ,
*शिवराय मनामनात , शिवजयंती घराघरात* या संकल्पनेतून दिवा शहरातील शिवजयंती साजरी करणारे प्रमुख मंडळ तसेच सामाजिक संघटनांचा सन्मान आयोजकांन कडून करण्यात आला होता. या सोहळ्यात सौ सपना रोशन भगत यांच्याकडून सिंधुदुर्ग जिल्हा सेवाभावी संस्थेचे सामाजिक क्षेत्रातील कामगिरी पाहता संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करून त्यांचा सन्मान करण्यात आला.
शिवरायांच्या मावळ्यांचा असा भव्य व्यासपीठावरील जाहीर सत्कार हा पहिल्यांदाच दिवा शहरात होत होता , या पूर्वी असा सन्मान संघटनांना क्वचितच मिळाला असेल… म्हणूनच सामाजिक सलोखा लक्षात घेऊन सिंधुदुर्ग जिल्हा सेवाभावी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांकडून या कार्यक्रमाचे आयोजक सौ सपना रोशन भगत व रोशन प्रभाकर भगत यांचा महाराजांची प्रतिमा देऊन भव्य सत्कार करण्यात आला.. सदर कार्यक्रमात संस्थेला दिलेला सन्मान पाहता सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी सेवाभावी संस्थेच्या वतीने संस्थेचे सरचिटणीस श्री समीर नारायण चव्हाण यांनी आयोजकांचे भरभरून कौतुक करून आभार व्यक्त केले… या सोहळ्यात संघटनेचे अध्यक्ष गणेश नेवगे ,सरचिटणीस समीर चव्हाण , कार्याध्यक्ष नितीन कोरगावकर, खजिनदार चंद्रकांत लाड , सहखजिनदार संदेश सावंत ,उपाध्यक्ष रवी मुनंनकर , सुदेश जाधव , हिशोब तपासणी सुशांत परब, प्रमुख सल्लागार गोविंद घाडीगावकर , ज्ञानेश्वर गावडे , रुपेश दुखंडे , किरण कोरगावकर , विठल गावडे , महेश जाधव, उदय तोरस्कर , अनंत पडेलकर , विनोद घाडी, विनायक पांचाळ ई. प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते..