Breaking
ब्रेकिंग

दिव्यात साई बाबा चॅरिटेबल ट्रस्टचा साई महोत्सला मोठया उत्साहात प्रारंभ…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिव्यात श्री साई बाबा चॅरिटेबल ट्रस्ट आयोजित श्री साई बाबा मंदीर देवस्थान दहावा वर्धापन दिन सोहळा व साईबाबा महाभंडारा 22 जानेवारी पासून सतत पाच दिवस मोठया उत्साहात प्रारंभ झाला आहे

सकाळी गणेश पूजन होऊन कलश पूजन व अभिषेक आरती संपन्न झाली तसेच आर एन विद्यालय ज्युनिअर कॉलेज च्या वतीने विज्ञान प्रदर्शन आयोजीत करण्यात आले व दुपारी शिव दुर्गा महिला मंडळ भजन अभंग होऊन सायंकाळी साईंची भव्य पालखी सोहळा काढण्यात आला लेझिम पथक पुणेरी ढोल च्या गजरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात अश्वावर आरूढ झालेले महाराजांची वेशभूषा साकारलेले कलाकार व मावळे देखील मिरवणुकीत सहभागी झाले होते राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा निम्मित साधून रथ देखील सजवण्यात आला होता राम लक्ष्मण सीता व हनुमान यांची वेशभूषा केलेले कलाकार सर्वाचे लक्ष वेधून घेत होते.शेकडो नागरिक महिला भगिनी मिरवणुकीत स
सहभागी झाल्या होत्या.
कार्यक्रमाची संकल्पना संस्थापक अध्यक्ष नरेश पवार ,सौ.रेश्मा पवार- अध्यक्षा यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजक यज्ञेश पवार असून व्यवस्थापक ओम साई ग्रुप व ओम साई महिला मंडळ तसेच नियोजन चिन्मय नरेश पवार यांनी केले आहे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे