Breaking
आरोग्य व शिक्षणकृषिवार्ताकृषीवार्तानोकरीब्रेकिंग

ठाणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या विशेष अर्थसंकल्प सभेत सौ स्नेहा अमर पाटील यांनी दिव्यातील महत्वाच्या कामाची मांगणी व अर्थसंकल्पात तरतुदीसाठी केली मांगणी व सूचना…

अमित जाधव - संपादक

0 2 4 3 6 0
ठाणे महानगरपालिकेच्या २०२६-२७ च्या विशेष अर्थसंकल्प सभेत बोलत असताना  नगरसेविका सौ स्नेहा अमर पाटील दिवा शहरातील खालील महत्वचा कामांची मागणी करुन या कामांसाठी अर्थसंकल्पात  अंतर्भाव व तरतुद करण्याची मागणी व सुचना केली*.
आज दिवा पुर्व – पश्चिमला जोडणारा उड्डाणपुल गेल्या  अनेक वर्षापासुन प्रलंबित आहे . काही जमिन हास्तांतर न झाल्यामुळे पुलाचं काम धिम्या गतीने सुरु आहे . यामुळे जमिन मालकांना योग्य तो मोबदला देऊन हास्तंतर प्रक्रिया जलदगतीने पुर्ण करुन उ्डाणपुलाचे काम लवकरात लवकर कसा करता येईल यासाठी नियोजन व तरतुद  करणे
आगामी वर्षा मध्ये आपण मु्ंब्रा फायर स्टेशन ते दिवा शिळ रोड रसत्याचे बांधकाम करण्याचे ठरविले  आहे,  पण सध्या रस्ता काही बिल्डरांनी आपली मनमानी करत स्वताच्या  ताब्यात घेऊन त्याला गेट लावत बंद केला आहे .हा रस्ता वाहतुक कोंडीच्या वेळी , आपातकालीन परिस्थितीच्यावेळी महत्वाचा आहे . त्यामुळे हा रस्ता आपण ताब्यात घेऊन त्यांची डागडुजी करून  व जनतेसाठी खुला केला पाहिजे*.
प्रभागातील मु्ंब्रादेवी कॅालनी रस्ता, रिलायन्स टॅावर रस्ता , नारायण भगत नगर रस्ता तसेच डि.जी कॅम्पलेक्स परिसरातील अंतर्गत रसत्यांचं कॅाक्रिटीकरण करण्यासाठी  तरतुद करणे*.
दिव्यातील बस प्रवाशांसाठी शहरात कोणतंही प्रकारचं बस स्टॅाप नसल्यामुळे भर उन्हात व भर पावसात त्यांना उभं राहुन बसची वाट पाहावी लागतं त्यामुळे दिवा -शिळ रोडवर छत्रपती शिवाजी महाराज चौकाजवळ बस स्टॅाप बांधण्यासाठी कार्यवाही करणे*.
प्रभागातील अनेक नाले जे शहरातुन खाडीकडे जातात त्यांची पुनर्बांधणी करणे . पावसाळ्यामध्ये पाण्याचा निचरा योग्या रितीने होण्याचा दृष्टीने दिवा पुर्वेला गिरजावाडी ते रेल्वे कलवर्ट नाला, दिवा चौक जवळील नाला, सिध्दांत पार्क ते खाडी बांधण्यासठी तरतुद करणे* .
वाढत्या नागरिकरणामुळे साबे व दातिवली स्मशान भुमी व भार येत असल्यामुळे खार्डी ब्रिज जवळ नविन स्मशान भुमी बांधण्यासाठी तरतुद होणे गरजेचे आहे
*स्टेशन बाहेर  साबे रसत्या लगत सध्या मच्छी मार्केट असल्यामुळे नागरिकांना , वाहनधारकांना अरुंद रसत्यावरुन रहदारी करताना कसरत करावी लागतं . मच्छी मार्केटसाठी योग्य जागा नियोजित करुन  मार्केट बांधणे*.
*मलःनिसाराण योजने अंतर्गत आज हि प्रभागातील बऱ्याच रसत्यांवर मलवाहिनी (ड्रेनेज लाईन) टाकण्याचा बाकी आहेत , तसेच एस.टी. पी  प्लॅंट चा काम असेल , या कामांची पुर्तता येणाऱ्या आर्थिक वर्षात पुर्ण करण्याचा हेतुने पाऊले उचलण्याची मागणी*.
दिवा शहराची वाढलेली लोकसंख्या पाहता शहरातील पाणी पुरवठा नियमित करण्याचा दृष्टीने  शिळफाटा ते  छत्रपती शिवाजी महराज चौक जलवाहिनीचे बाकी काम लवकरात लवकर पुर्ण करणे
त्या बरोबर दिवा पश्चिमला पाणी पुरवठा करण्यासाठी गेल्या अनेक वर्षाची मागणी असलेल्या पुश थ्रु पाध्दतीने जलवाहिनी  टाकण्यात येणाऱ्या कामासाठी आपण नुकतीच दिड कोटीची रक्कम रिलीज केली आहे , उर्वरित रक्कम हि लवकरच रिलीज करण्यासाठी तरतुद करणे गरजेचे आहे जेणे करुन वर्षभरात पाण्याची गंभीर समस्या आपल्याला सोडवत येईल*.
माझा प्रभागातील बहुतांश रहिवाशी नोकरदार वर्गातले असून  पहाटे लवकर पासुन तर रात्री उशिरा पर्यंत वर्दळ असते त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातुन आम्ही गेल्या कार्यकाळामध्ये बहुतांश रसत्यांवर , गल्ली वसत्यांमध्ये एल.ई.डी पथदिवे लावले आहेत . परंतु आता बऱ्याच ठिकाणी हे पथदिवे त्यांची कार्यक्षमता संपल्यामुळे ते बदलणे आवश्यक आहेत.*
🔴आरोग्य*
*आरोग्याचा दृ्ष्टीतुन पाहायचा झाला तर मला वाटतं कि आपल्याला प्रथम स्वच्छतेकडे लक्ष्य द्यावे लागेल, त्या मध्ये  रस्ते स्वच्छते बद्दल बोलेल कि फक्त दिव्यापुरता विशेष प्रभाग क्रं २७ व २८ साठी आपण एक मॅकेनिकल स्वीपर मशिनसाठी तरतुद करण्यात यावी*.
*अपुऱ्या कर्मचाऱ्यांमुळे आज अनेक रस्ते आठवड्यातुन एकदाच साफ केले जातात ,त्यासाठी सफाई कामगारांची संख्या वाढविण्यात यावी*.
दिवा क्षेपणभूमीवर शास्त्रेक्त पध्दतीने प्रक्रिया केली जात आहे , पण रोज रात्री या क्षेपणभुमिवर आग लागते व त्यामुळे परिसरात धुराचे लोण पसरते ज्याचा परिणाम रहिवाशांच्या आरोग्यावर होत आहे . या  क्षेपणभुमीवर  आणाखी चांगल्या प्रकारे प्रक्रिया कशी करता येईल याकडे लक्ष देणे
शहरातील वातावरण आरोग्यदायक करण्याचा दृष्टीनं एक पाऊल पुढे म्हणुन  शहरातील मुख्य दिवा-शीळ रोड सह मुख रसत्यांवर वृक्ष लागवड करण्यासाठी तरतुद करणे आदी मांगण्या सभागृहात मांडल्या
तसेच माननिय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॅा श्रीकांत शिंदे यांनी  गेल्या कार्यकाळ मध्ये व प्रशासकिय कार्यकाळ मध्ये दिव्याचा विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा शासन निधी दिल्याबद्दल आभार मानत त्यांनी आपल
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 4 3 6 0

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे