बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांसाठी, व्यावसायिकांसाठी, महाराष्ट्रातील ठिकाणांची माहिती, नवीन आलेल्या चित्रपटाची समीक्षा,यांच्या माहितीचे हक्काचे पेज म्हणजे मराठी स्टार. नवोदित कलाकार व्यवसायिकयांची माहिती ,महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोच ध्येय वेडा कलाकार. अभिनेते व फाइट मास्टर..पंकज ठाकूर…

अमित जाधव-संपादक

महाराष्ट्रातील नवोदित कलाकारांसाठी, व्यावसायिकांसाठी, महाराष्ट्रातील ठिकाणांची माहिती, नवीन आलेल्या चित्रपटाची समीक्षा,यांच्या माहितीचे हक्काचे पेज म्हणजे मराठी स्टार. नवोदित कलाकार व्यवसायिकयांची माहिती ,महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यापर्यंत पोहोच
ध्येय वेडा कलाकार. अभिनेते व फाइट मास्टर…..पंकज ठाकूर.

अभिनेता पंकज ठाकूर हे नाशिकचे आहेत. त्यांचे शालेय शिक्षण हे एकलहरे माध्यमिक विद्यामंदिर या ठिकाणी झाले. तर त्यांचे कॉलेजचे शिक्षण के.जी. मेहता कॉलेज नाशिक रोड या ठिकाणी पूर्ण झाले.

पंकज ठाकूर यांना लहानपणापासून मार्शल आर्ट व कराटेचे वेड होते. कराटे मार्शल आर्ट मुळे कलाक्षेत्राची आवड निर्माण झाली. शाळा व कॉलेजमध्ये पंकज ठाकूर यांनी मार्शल आर्ट मध्ये अनेक पारितोषिक मिळवली आहेत. कॉलेजचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर नाशिक टायगर जिम या ठिकाणी झालेल्या स्पर्धेदरम्यान पंकज ठाकूर यांचे गुरु शिवाजी गोडसे, राजेश झरबडे व डॅनियल सर यांनी पंकज ठाकूर यांच्यातील कलागुण ओळखले व या क्षेत्रामध्ये करियर करण्याचे मार्गदर्शन केले.

त्यानंतर तेक्मा मिक्स मार्शल आर्टचा रियालिटी शो इंडियामध्ये सुरू होणार होता त्यासाठी ऑफिशियल टीम चे ऑडिशन झाले त्यामध्ये सिने अभिनेता संजय दत्त व अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांच्या सोबत रियालिटी शो मध्ये पंकज ठाकूर यांची जज म्हणून निवड झाली आणि तिथून त्यांचा कलाक्षेत्राचा प्रवास सूरु झाला. त्यानंतर त्यांनी अनेक सेलिब्रिटी सोबत काम केली.

बराच काळ कलाक्षेत्रात घालवल्या नंतर पंकज ठाकूर हे महाराष्ट्र गृहरक्षक दलाचे जवान म्हणून भरती झाले. कर्तव्य बजावत असताना कलाक्षेत्रा पासून लांब होत गेले आणि महाराष्ट्र पोलिसांसोबत काम करू लागले पण हे काम करत असतांना त्यांच्यातला कलाकार शांत बसत नवता. जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पंकज ठाकूर यांनी पुन्हा एकदा कलाक्षेत्रात पदार्पण केले.

पंकज ठाकूर हे मार्शल आर्ट व कराटेमध्ये निपून आसल्यामुळे त्यांना अनेक चित्रपटांमध्ये त्यांना ॲक्शन डायरेक्टर म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि त्याच संधीचे त्यांनी सोन केले. त्यानंतर त्यांनी बुरखा व रण या चित्रपटामध्ये ॲक्शन डायरेक्टर म्हणून काम केले. कलाकारातले कलागुण कधीच लपून राहत नाही जसे की सूर्य चमकल्या शिवाय राहत नाही तसेच कलागुन लपून राहत नाही.

ते एक उत्तम अभिनेते पण आहे. सुंदरा मनामध्ये भरली व नूकतीच कलर्स मराठी या वाहिनीवर सूरु असलेली योग योगेश्वर जय शंकर या मालिकेत ते मुख्य पंच यांचे पात्र साकारत आहे. झी मराठी वरील तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं या मालिकेत सुद्धा ते मुख्य गावकर्याची भूमिका साकारत आहे. अभिनेते, लेखक, दिग्दर्शक, फाईट मास्टर पंकज ठाकूर यांनी स्वतःच्या मेहनतीने व जिद्दीने व चिकाटीने कलाक्षेत्रात उत्तुंग भरारी घेतली आहे. पंकज ठाकूर यांनी एक नवीन चित्रपटाची निर्मिती केली आहे. त्यांच्या ह्या चित्रपटाचे नाव “हृदयस्पर्शी” हा चित्रपट लवकरच जवळच्या चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. याच बरोबर त्यांनी अनेक चित्रपट, शॉर्ट फिल्म व वेब सिरीज मध्ये अभिनेते व फाईट मास्टर म्हणून पंकज ठाकूर यांनी काम केली आहेत. या कलाक्षेत्रात अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करत राहतात त्यानांच यश प्राप्त होते. त्या मुळे शेवटपर्यंत
#अभिनेतेपंकजठाकूर
#yogyogeshwarjayshankar
#tuzyamazyasansaralaanikayhav
#SundaraManamadhyeBharali

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे