आशा सेविकांना मार्च प्रयन्त थकीत असलेलं देयके देण्यात येईल…राजेश टोपे -आरोग्य मंत्री
अमित जाधव-संपादक
मुंबई – कोरोना काळात जीवाची बाजी लावणाऱ्या राज्यातील आशा सेविकांना मार्च अखेरीस थकीत देयके देण्यात येईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. काँग्रेसच्या डॉ. प्रज्ञा सातव यांनी आशा सेविकांच्या थकीत वेतनाचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला. यावर आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले की सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आशा सेविकांना राज्य आणि जिल्हा स्तरावर प्रोत्साहनपर पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. राज्य स्तरावर पहिले पारितोषिक एक लाख, द्वितीय ७५ हजार तर तृतीय पारितोषिक ५० हजार रुपयांचे असेल. त्याचप्रमाणे जिल्हा स्तरावर पहिले पारितोषिक ५० हजार, तर द्वितीय पारितोषिक तीस हजार रुपयांचे असणार आहे, अशी माहिती टोपे यांनी दिली. तसेच जुलै महिन्यापासून त्यांच्या मानधनात ५०० रुपये वाढ केली जाईल. राज्याचा १८० कोटी रूपयांचा हिस्सा देण्यात येईल, असेही ते म्हणाले.


