ब्रेकिंग
ठाणेकरांसाठी गुडन्यूज आहे. कारण आता त्यांना बोरिवली ते ठाणे अंतर 12 मिनिटांत पूर्ण करता येणार…
अमित जाधव - संपादक

ठाणेकरांसाठी गुडन्यूज आहे. कारण आता त्यांना बोरिवली ते ठाणे अंतर 12 मिनिटांत पूर्ण करता येणार आहे. ठाणे-बोरीवली दुहेरी बोगदा या प्रकल्पाचे काम लवकरच सुरू होणार आहे. या प्रकल्पासाठी बोरीवली बाजूकडील उर्वरित 3,658 चौ. मी जागा झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाने एमएमआरडीएकडे हस्तांतरीत केली आहे. या मार्गावर 10.25 किमी लांबीच्या बोगद्याचा समावेश आहे. नॅशनल पार्कच्या पोटातून हे दोन बोगदे जाणार आहेत.