Breaking
ब्रेकिंग

लोकसभेच्या निवडणुका १६ एप्रिलला होणार? निवडणूक आयोगाचं पत्र व्हायरल ते निवडणूक तारखेचे नाही तर…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

लोकसभेच्या निवडणुका १६ एप्रिलला होणार? निवडणूक आयोगाचं पत्र व्हायरल, नंतर स्पष्टीकरणही दिलं…

नवी दिल्ली- लोकसभेच्या निवडणुकीची तारीख ही १६ एप्रिल ठरल्याचं निवडणूक आयोगाचं एक पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने स्पष्टीकरण दिलं आहे. निवडणुकीच्या कामासाठी फक्त संदर्भ म्हणून ही तारीख नोंद केल्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं. त्यामुळे १६ एप्रिल रोजी निवडणूक होणार या बातम्यांना आता ब्रेक लागला आहे.

निवडणूक आयोगाच्या सीईओच्या कार्यालयातून एक पत्र सोशल मीडियावर समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. त्यामध्ये निवडणूक आयोगाने १६ एप्रिल ही निवडणुकीची तारीख म्हणून धरल्याचं सांगण्यात येतंय. ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर आता निवडणूक आयोगाला त्यावर स्पष्टीकरण द्यावं लागलं आहे.

निवडणूक आराखड्याचे नियोजन करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या संदर्भासाठी ही तारीख वापरल्याचं निवडणूक आयोगाने म्हटलंय. त्या माध्यमातून १६ एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार नसल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं.

 

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे