बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यात सुजाता हॉटेल जवळील अशोका रेसिडेन्सी मध्ये घराला लागली आग…

अमित जाधव - संपादक

 

आज दिनांक २४/०२/२०२५ रोजी ०७:५२ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार अशोका रेसिडेन्सी, सुजाता हॉटेलच्या जवळ, सद्गुरु नगर, दिवा (पूर्व). या ठिकाणी *अशोका रेसिडेन्सी (तळ+०५ मधली इमारत)* या इमारतीमधील ‘ए’ विंगच्या पहिल्या मजल्यावरील *रूम क्रमांक:-१०६ (मालक:- श्री. शत्रुघ्न वसंत मेस्त्री)* या रूममध्ये आग लागली होती. *सदर घटनास्थळी दिवा पोलीस कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान ०१-रेस्क्यु वाहनासह व ०१-फायर वाहनासह उपस्थित होते.* सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.

सदर घटनास्थळी घरामध्ये आग लागल्यामुळे घरातील फ्रिज, कपडे, किचन रूम मधील साहित्य व इलेक्ट्रिक वायरिंग पूर्णपणे जळाली आहे.सदर घटनास्थळी लागलेली आग ०८:२५ वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.*

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे