Breaking
ब्रेकिंग

दिव्यातील अनधिकृत बांधकाम खाडणी उकळणाऱ्या दोघांना केली अटक न्यायालयाने सुनावली चार दिवसाची पोलीस कोठडी…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा दातीवली ठाणे यांनी इसम नामे गोवर्धन पाटील, रा डोंबीवली, ठाणे व त्याचे सहकारी सन्नी, जितू वाघमारे हे मिळुन ते मुंब्रादेवी परिसरात करीत असलेल्या इमारतीचे बांधकामाविरोधात ठाणे महानगरपालीकेत तकार करण्याची धमकी देवुन तकार न करण्यासाठी ५०,०००/- रूपयेची मागणी केली तसेच पैसे न दिल्यास जिवे ठार मारण्याची धमकी दिली.
ठाणे शहरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मालोजी शिंदे यांनी खंडणीची मागणी करणाऱ्या इसमांना खंडणीची रक्कम स्वीकारतांना रंगेहाथ पकडण्याचे ठरवुन दिनांक ०३/०७/२०२४ रोजी तक्रारदार यांना खंडणी विरोधी पथक कार्यालय येथे बोलावुन घेवुन सापळा कारवाईचे आयोजन करून लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडण्यात आले असून त्यांचे विरोधात तक्रादार यांचे तकारीवरून शिळडायघर पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहिता कलम ३०८(२), ३०८(३), ३०८(४), ३०८ (५) प्रमाणे दिनांक ०३/०७/२०२४ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमुद गुन्हयातील आरोर्पीना न्यायालयात हजर केले असता मा. न्यायालयाने सदर आरोपींना दिनांक ०९/०७/२०२४ रोजीपावेतो पोलीस कोठडी दिली आहे.

सदरची कारवाई मा. पोलीस आयुक्त, ठाणे शहर श्री. आशुतोष डुंबरे, मा. पोलीस सह आयुक्त, श्री. ज्ञानेश्वर चव्हाण, मा. अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री. पंजाबराव उगले, मा. पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री शिवराज पाटील, मा. सहायक पोलीस आयुक्त, शोध २, गुन्हे शाखा, श्री राजकुमार डोंगरे, सहायक पोलीस आयुक्त, विशेष कार्य दल, गुन्हे शाखा, श्री. शेखर बागडे, वपोनि/मालोजी शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली खंडणी विरोधी पथकातील मपोनि/वनिता पाटील, सपोनि/श्रीकृष्ण गोरे, सपोनि/भुषण कापडणीस, सपोनि /सुनिल तारमळे, पोउनि / विजयकुमार राठोड, सपोउनि/सुभाष तावडे, सपोउनि/कल्याण ढोकणे, सपोउनि/संजय बाबर, पोहवा/सचिन शिंपी, पोहवा/योगीराज कानडे, पोहवा/संदिप भोसले, पोहवा/संजय राठोड, मपोहवा/शितल पावसकर, मपोशि/मयुरी भोसले, पोशि/तानाजी पाटील, पोशि/अरविंद शेजवळ, चापोना/भगवान हिवरे यांनी केली आहे.

ठाणे, भिवंडी, कल्याण, उल्हासनगर, बदलापूर परिसरातील रहिवाश्यांना याद्वारे आवाहन करण्यात येते की अशाप्रकारे कोणी ब्लॅकमेल करून खंडणी उकळण्याचा प्रयत्न करीत असेल तर नागरीकांनी त्वरीत खंडणी विरोधी पथक, गुन्हे शाखा ठाणे शहर येथे तकार दाखल करावी. त्याबाबत उचित कार्यवाही करण्यात येईल.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे