ब्रेकिंग
मध्यरेल्वेच्या वेळापत्रकात पाच ऑक्टोंबर पासून बद्दल, दादर वरून कर्जत व कसारा वीस जलद लोकल सोडण्यात येणार..
अमित जाधव - संपादक

लोकलने कर्जत व कसारा मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी आनंदाची बातमी आहे. आता दादरवरून कर्जत व कसारा मार्गावर 20 जलद लोकल सोडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये 5 ऑक्टोबरपासून बदल करण्यात येणार आहे. सीएसएमटी व दादर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता प्रवाशांना दादरवरून सीएसएमटीला जाण्याची गरज पडणार नाही.
बहुतेक दिवा ते सी एस टी एम लोकल फेरी देखील सुरू होण्याची शक्यता आहे