ब्रेकिंग
धर्मवीर 2 चित्रपटाचा शुभमुहूर्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थित,केव्हा येणार चित्रपट..पहा संपूर्ण बातमी
अमित जाधव - संपादक
ठाणे -शिवसेनेचे दिवंगत ठाणे जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या आयुष्यावर बेतलेला धर्मवीर या चित्रपटाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निकटवर्तीयांनी आता धर्मवीर २ या चित्रपटाची निर्मिती करण्याचा निर्णय घेतला. शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडाच्या एक महिन्यापूर्वी धर्मवीर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. त्यांचे अत्यंत विश्वासू सचिन जोशी यांची या चित्रपटाच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका राहिली होती.
धर्मवीर पहिल्या भागानंतर आता दुसऱ्या भागांत 2024 साली प्रदर्शित होणार आहे. धर्मवीर 2 चित्रपटाचं लेखन आणि दिग्दर्शन प्रविण तरडे करणार आहेत. आज ठाण्यातील कोलशेत परिसरात चित्रपट मुहूर्त सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.