दिव्यात अनाधिकृत बांधकामावर कारवाई,दिवा प्रभाग समिती सहायक आयुक्त यांनी तीन ते चार बांधकामे केली जमीनदोस्त….
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता २७ सप्टेंबर : दिवा प्रभाग समितीच्या अतिक्रमण विभागाने ऐन गणेशउत्सवात अनधिकृत बांधकामावर कारवाई केली आहे. ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त अभिजित बांगर यांच्या आदेशानुसार सदरची कारवाई दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त अक्षय गुडधे यांनी कारवाईचा बडगा उभारला आहे.
दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांच्या नेतृत्वाखाली आज अतिक्रमण विभागाचे श्री लहाने व श्री जगताप यांच्या पथकाने दिवा शहरातील साबेगाव येथील जीवदानी नगर भागातील प्रियदर्शनी अपार्टमेंट जवळील अंदाजे 40X50 चौ.फूट व 20X40 चौ. फूट सुरु असलेली दोन बांधकामे तर दळवी नगर,श्लोक नगर रस्ता, प्रेम विराज अपार्टमेंट मागे, दीवा पुर्व येथिल ठिकाणीं राकेश काशिराम पवार बांधकाम धारक यांचे मार्फत उभारत असलेले अनधिकृत जोत्या वरील कॉलम मा. सहाय्यक आयुक्त सो. यांचे आदेशनवे जे सी बी मार्फत तोडण्याची कारवाई करण्यात आली. तर काही दिवसापूर्वीच दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुडधे यांनी आक्रमक पवित्रा घेत दिव्यातील अनेक अनधिकृत बांधकाम कारवाई केली होती.
प्रसंगी दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त यांनी यापुढेही अनधिकृत बांधकामावर कारवाई होत राहणार आहे असे बोलताना स्पष्ट केले.



