बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

कळव्यात चालत्या लोकल वर दगड फेक,वयोवृद्ध इसम जखमी…

अमित जाधव-संपादक

ठाणे :- कळव्यात सायंकाळी 8-27 वाजता कळवा रेल्वे स्थानकापुर्वी रेल्वे पुलाच्या दरम्यान फलाट क्रमांक एक वरुन कल्याण दिशेने जाणाऱ्या लोकलवर काही टारगट समाजकंटकानी दगडफेक केली .त्यामधे कळवा येथे उतरणे साठी दरवाज्यात उभे असणाऱ्या बालचंद गुप्ता(35) या कळवा पूर्व शांतीनगर येथे राहणाऱ्या प्रवाशाचे नाकाला मार लागला असून सदर व्यक्तीच्या नाकपूडीला मार लागला असून रक्त वाहात आहे. सदर प्रवाशाला रेल्वे पोलिसांच्या मदतिने छ.शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करुन उपचार सुरू असून ENT डाॕक्टरांचे सल्यानूसार पुढील उपचार सुरू राहणार आहेत. अशाप्रकारे दगडफेकिच्या घटना दहाबारा वर्षे पुर्वी ठाणे व कळवा दरम्यान जलदगती मार्गावर मोठ्या प्रमाणात घडत होत्या त्या मधे काही महिलांना गंभीर दुखापत झालेली होती .त्याची दखल घेऊन रेल्वे पोलिस व शिवसेनेच्या वतीने कारवाई करुन त्याला आळा बसला होता .आताही *पोलिस व शिवसेना* यांचे वतिने समाजकंटकांचे विरोधात उद्या पासुनच *समाजकंटकाना तडीपार* मोहिम राबविली जाणार आहे . सदर दुर्घटनेची खबर मिळताच घड्याळ चौक, मशाल गल्ली, कळवा येथील *उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना कार्यालयातील* शिवसैनिकांनी त्वरीत कळवा रेल्वे स्थानकावर जाऊन जखमी प्रवाशाला मदत केली .रेल्वे पोलिसांना सहकार्य करीन जखमीला योग्य उपचार करणेस मदत केली. सदर प्रसंगी शिवसेना भगवा गार्डसदस्य व शिवसेना कळवा शहरप्रमुख चंद्रकांत विधाटे, कल्याण उपजिल्हाप्रमुख विजय देसाई, विधानसभा सहसंघटक राजेंद्र दहीबांवकर, विभागप्रमुख राजेंद्र शिंदे,व शिवसैनिक मंगेश पडेल, आणि सुनील राणे उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे