Breaking
क्रिडा व मनोरंजनब्रेकिंग

दिवा एक जंक्शन चरित्र व चारित्र्य ” पुस्तक प्रकाशन सोहळा उद्या 20 सप्टेंबरला सुमित हॉल येथे होणार सपन्न… ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांची विशेष उपस्थिती…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे ता ११ सप्टें : सन ३ एप्रिल १८६७ रोजी सुरु झालेले दिवा रेल्वे स्थानक अर्थात “दिवा एक जंक्शन चरित्र व चारित्र्य ” पुस्तक प्रकाशन सोहळा येत्या 20 सप्टेंबर २०२५ रोजी होत आहे. दिवा शहरातील साऊथ इंडियन इंग्लिश स्कूल व रेनबो इंग्लिश स्कूल तसेच सिनेरामा प्रकाशन आयोजित ” दिवा एक जंक्शन चरित्र आणि चारित्र्य” हे दिवा गांवावर आधारीत लेखक राम माळी आणि सुधीर राऊत यांनी लिहलेल्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा शनिवार, २० सप्टेंबर २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता दिवा आगासन रोड,सुमित हॉल, दिवा पूर्व येथे सन्माननीय पाहुणे ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या शुभ हस्ते संपन्न होणार आहे.

एक काळ असा होता की दिव्यात रहायला यायला पूर्वी माणसं घाबरायची शे-पाचशे लोकांचा असलेला आगरी कोळी समाज बांधवांचा दिवा गांव होता.. विविध कारणांनी बदनाम झालेला दिवा… कुप्रसिद्ध असा दिवा… ही पूर्वीच्या दिव्याची ओळख होती… अनेक वर्षापूर्वी दिव्यात राहायला येण्या आधी माणसं एकमेकांत बोलायची… काय दिवा ? नको रे बाबा…. आणि आज परिस्थिती नेमकी उलटी झालेली आहे. दिव्यात लोंढेच्या लोंढे माणसं राहायला येत आहेत. मध्य रेल्वे स्थानकावरील ठाणे डोंबिवली पाठोपाठ “प्रचंड गर्दीचे रेल्वे स्थानक” म्हणून दिवा जंक्शनकडे पाहिले जाते. अनेक मोठ मोठ्या राजकीय पक्षाच्या व्यक्तींची मतदानाचे आराखडे आता दिव्यातून बांधले जातात… का ? याची कारणं काय आहेत ? कोणत्या कारणांमुळे ही गर्दी वाढली ? आणि का ? असं पूर्वी काय घडत होतं दिव्यात ? आणि आता काय घडतं आहे दिव्यात ? हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला दिवा एक जंक्शन चरित्र आणि चारित्र्य वाचायला हवे असे लेखक राम माळी व सुधीर राऊत यांनी बोलताना स्पष्ट केले असून सदर पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अनेक मान्यवर उपस्थित राहणार असून सर्व दिवा वासीयांनी उपस्थित राहून दिव्यातील गुपिते जाणावी असे आवाहन केले आहे.

 

3/5 - (1 vote)

बेधडक ठाणे न्यूज

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे