Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

मुब्रा व दिव्यातील रेल्वे लगतच्या रहिवासीयांना जितेंद्र आव्हाड यांचे आश्वासन ,घरांवर ज्यांनी तिरंगा फडकवला त्यांना बेघर होऊ देणार नाही ,डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वेच्या प्रबंधकांना दिला इशारा…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

घरांवर ज्यांनी तिरंगा फडकवला त्यांना बेघर होऊ देणार नाही
डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वेच्या प्रबंधकांना दिला इशारा

मुंबई (प्रतिनिधी)- मुंब्रा येथील 22 इमारतींना रेल्वेने नोटीस बजावून त्या रिकाम्या करण्याचे सूचित केले आहे. मात्र, मुंब्राच काय, कल्याण, मुंबईतील एकाही नागरिकांना बेघर होऊ देणार नाही. यापुढे नोटीसच काय, सदर इमारतींच्या जवळपासही फिरकू देणार नाही; ज्या नागरिकांनी हर घर तिरंगा अभियानात सहभाग घेऊन आपल्या घरांवर तिरंगा फडकवला त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये बेघर होऊ देणार नाही, असा इशारा माजी गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी मध्य रेल्वेचे मंडल प्रबंधक सलभकुमार गोयल यांची भेट घेऊन दिला.
मुंब्रा रेल्वेस्थानक परिसरातील 22 इमारतींना रेल्वे प्रशासनामार्फत नोटीस पाठविण्यात आलेल्या आहेत. या इमारतींना अचानक नोटीसा बजावण्यात आल्यामुळे लोकांमध्ये संभ्रमावस्था व भीतीचे वातावरण निर्माण झाले. या पार्श्वभूमीवर डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वेच्या मुख्यालयात जाऊन रेल्वे प्रबंधक सलभकुमार गोयल यांची भेट घेतली. या भेटीमध्ये रेल्वे प्रबंधकांनी आणखी नोटीसा बजावण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यावर डॉ. आव्हाड यांनी आक्रमक भूमिका घेतली.
डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रबंधक सलभकुमार गोयल यांना सांगितले की, मुंबईतील सुमारे 30 हजार झोपड्या आणि मुंब्रा ते कल्याण दरम्यानच्या शेकडो इमारती पाडण्याचे धोरण रेल्वेचे असले तरी आता 40 वर्षानंतर कोणालाही बेघर करण्याचा अधिकार केंद्र सरकारला नाही. केंद्र सरकारने माणुसकीची कास धरुन नागरिकांना बेघर करु नये. तसा प्रयत्न झाला तर इमारतींच्या आसपासही रेल्वेच्या प्रशासनाला फिरकू देणार नाही. फारफार तर गोरगरीबांवर गोळीबार कराल; पण, त्यापेक्षा अधिक काही आपण करणार नाहीत; त्यामुळे या नोटीसा रद्द कराव्यात, अशी मागणीही डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी केली. त्यावर रेल्वे प्रबंधकांनी याबाबत वरिष्ठांना कळविण्यात येणार असून सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे सांगितले.

दिवाळी प्रयन्त मुंब्रा रेल्वेस्थानकातील सरकते जिने सुरु होणार

मुंब्रा रेल्वे स्थानकामध्ये सरकते जिने बसविण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. हे काम थांबले असल्याचे डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी रेल्वे प्रबंधकांच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर सदरच्या कामाला न्यायालयीन स्थगिती असल्याचे

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे