
दिनांक ११/७/२०२५ रोजी २२:३९ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार डीजी कॉम्प्लेक्स जवळ, साबेगाव, दिवा, ठाणे, या ठिकाणी *कियारा हाईट्स (तळ+०७ मजली इमारत)* या इमारतीमध्ये सातव्या मजल्यावरील रूम क्रमांक:- ७०१ (मालक:- श्रीमती. जया पाटील)या रूममध्ये आग लागली होती. सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१- रेस्क्यू वाहनासह उपस्थित होते.
आग लागलेल्या रूममध्ये श्रीमती. जया पाटील या एकट्याच होत्या, आग लागताच त्या सुरक्षित घराच्या बाहेर आलेल्या होत्या.सदर रूम मध्ये ३ घरगुती एच. पी. सिलेंडर होते, त्या पैकी एक सिलेंडर लिकेज असून सुरक्षेतेच्या कारणास्तव सर्व सिलेंडर अग्निशमन दलाच्या जवानांनी ताब्यात घेतले आहेत.सदर घटनास्थळी लागलेल्या आगीमध्ये रूम मधील कपडे, लाकडी कपाट, फ्रिज, घरातील इतर साहित्य व इलेक्ट्रिक वायरिंग इत्यादी पूर्णपणे जळाले आहे.
सदर घटनास्थळी लागलेली आग २३:२० वाजताच्या सुमारास अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली असून, परिस्थिती नियंत्रणात आहे.*