ठाणे, दिवा ता १९ जानेवारी : मुंब्रा येथील समाजसेवक देवा किणे व वैभव किणे यांनी आपल्या वडिलांच्या तिसऱ्या स्मृतिदिना निमित्त मुंब्रा शहरातील मुंब्रा रेल्वे स्थानक ते कौसा, शीळफाटा परिसरातील कडाक्याच्या थंडीत उघड्यावर झोपलेल्या गोर गरिबांना ब्लँकेट वाटप करण्यात आले.
समाजसेवक देवा किणे हे महाराष्ट्र राज्य ठाणे जिल्हा मुंब्रा शहर टायगर ग्रुपचे अध्यक्ष असून वडील कै. पांढरी पांडुरंग किणे यांच्या तिसऱ्या पुण्यस्मरण दिनानिमित्त ऐन थंडीत कुडकुनाऱ्या व उघड्यावर जोपणाऱ्या गोर-गरिबांना पाहून सामाजिक आपुलकीच्या दृष्टीने १५० पेक्षा अधिक गरजू लोकांना ब्लैंकेट वाटण्यात आले. प्रसंगी टायगर ग्रुपचे सदस्य सागर मिश्रा, हासनेन खान, अजीझ शेख , अरबाज खान आदी उपस्थित होते.