ब्रेकिंग
गुढीपाडव्या निमित्त भव्य मोफत नेत्र चिकित्सा शिबिर संपन्न…* आयोजक दिवा शिवसेना उपशहर प्रमुख तथा मा. नगरसेवक शैलेश पाटील.
अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता ३० मार्च : मराठी नूतन वर्ष व गुढीपाडव्या निमित्त दिवा शिवसेना उपशहर प्रमुख तथा मा. नगरसेवक शैलेश मनोहर पाटील यांनी दिवेकरांसाठी महात्मे डोळ्यांचे हॉस्पिटल मुलुंड, मुंबई यांच्या सहयोगाने भव्य मोफत नेत्र चिकित्सा शिबिर शैलेश पाटील यांच्या सद्गुरू नगर येथील मुख्य जनसंपर्क कार्यालयात आयोजित करण्यात आले होते.
गुढीपाडव्या निमित्त आयोजित भव्य मोफत नेत्र चिकित्सा शिबिरात मोफत नेत्र तपासणी व उपचार, मोफत चष्मा वाटप, मोफत मोती बिंदू ऑपरेशन व मोफत थाईरॉईड तपासणी करण्यात आली. प्रसंगी शेकडो दिवेकरांनी सदर शिबिराचा लाभ घेतला. शेकडो शिबिरार्थीनां मोफत चष्मा वाटप करण्यात आले तर अनेक महिलांची थायरॉइड तपासणी करण्यात आली. प्रसंगी अनेक मान्यवरांनी आपली उपस्थिती दर्शविली तर दिवा शिवसेनेचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.