
तुम्हीही हॉटेलमध्ये जेवायला जात असाल तर काळजी घ्या. कारण नवी मुंबईतील ऐरोली सेक्टर 4 मधील पर्पल बटरफ्लाय हॉटेलमध्ये जेवणात चक्क उंदीर आढळला आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली. आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त काही महिला हॉटेलमध्ये जेवायला गेल्या होत्या. यावेळी जेवणात मेलेला उंदीर आढळल्याने हॉटेल व्यवस्थापनाने आपली चूक मान्य केली आहे. तर महिलांनी रबाळे पोलिसांत हॉटेल विरोधात तक्रार दाखल केली.