Breaking
क्रिडा व मनोरंजनगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय,राज्यातील महापालिका आरक्षण सोडतीचा कार्यक्रमाच्या तारखा जाहीर…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

राज्य निवडणूक आयोगाचा निर्णय,राज्यातील महापालिका आरक्षण सोडतीचा कार्यक्रमाच्या तारखा जाहीर

नुकतेच राज्य निवडणूक आयोगा ने महापालिकांच्या निवडणुकीची अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध केली आहे. त्यापाठोपाठ आता मुंबई वगळता नवी मुंबई, वसई विरार, उल्हासनगर, कोल्हापूर, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, कल्याण डोंबिवली आणि ठाणे या महापालिकांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम सोमवारी जाहीर केला. यानुसार आरक्षण सोडत ३१ मे रोजी जाहीर होणार आहे. त्याआधी २७ मे रोजी यासंदर्भातील नोटीस प्रसिद्ध करण्यात येईल. आरक्षण काढल्यानंतर दुसऱ्या दिवशी प्रभागनिहाय आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध केले जाईल. तर १ ते ६ जूनपर्यंत त्यावर हरकती आणि सूचना मागवण्यात येणार आहेत. आक्षेप आणि हरकतींवर विचार करुन अंतिम आरक्षण सोडत १३ जूनला अंतिम होऊन ते प्रसिद्ध होणार आहे.

आरक्षण अंतिम झाल्यानंतर निवडणूक प्रक्रियेसाठी साधारणचा दीड महिन्याचा कालावधी लागेल. त्यामुळे या पालिकांमध्ये सप्टेंबर किंवा ऑक्टोबरच्या सुरुवातीस निवडणूका होण्याचा अंदाज आहे. दरम्यान, महाराष्ट्रातील ओबीसी राजकीय आरक्षणावरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयात १२ जूनला होणार आहे. तोपर्यंत राज्य सरकार ट्रिपल टेस्ट आणि इम्पिरिकल डाटा तयार करुन सादर करणार का हे पाहावे लागणार आहे. महाराष्ट्र सरकारने ओबीसी आरक्षणासाठी बांठिया आयोगाची नियुक्ती केली आहे. बांठिया आयोगाचा अहवाल कोर्टात सादर करुन ओबीसी आरक्षण वाचवण्यात ठाकरे सरकारला यश येईल का हे १२ जूनलाच समजणार आहेत

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे