Breaking
ब्रेकिंगमहाराष्ट्र

दिव्यात भाजपसह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवबंधनात…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

*⭕️दिव्यात भाजपसह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवबंधनात*

ठाणे, दिवा, ता 28 फेब्रु ( संतोष पडवळ) : ठाणे मनपाच्या हद्दीतील दिवा शहरातील भाजपसह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत दाखल झाले आहेत. माजी उपमहापौर, शिवसेना दिवा शहरप्रमुख रमाकांत मढवी यांच्या व इतर शिवसेना नगरसेवकांच्या उपस्थितीत व अँड. आदेश भगत आणि निलेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली दिवा भाजप मंडळाच्या मोर्चाचे निलेश भोलानाथ पाटील यांच्यासह ६० पेक्षा अधिक पदाधिकारी व ४५० पेक्षा जास्त कार्यकर्त्यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला.

प्रसंगी भाजप युवा मोर्चा ठाणे शहरचे माजी सचिव, भाजप दिवा शहर उपाध्यक्ष, सचिव, भाजप शिक्षक आघाडी अध्यक्षा, १५ पेक्षा जास्त बूथ अध्यक्ष, उत्तर भारतीय मोर्चा पदाधिकारी, महिला मोर्चा अशा पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत प्रवेश केला.

दिव्यातील राष्ट्रवादीचे ब्लॉक कार्याध्यक्ष सूर्यकांत कदम यांच्यासह त्यांचे एकूण 52 कार्यकर्ते शिवबंध बांधून शिवसेनेत दाखल झाले आहेत त्यामुळे शिवसेनेचे पारडे अधिक जड झाले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे