Breaking
ब्रेकिंग

3000 रुपयांचा फास्ट टॅग पास काढा आणि वर्षभर टोल न भरता फिरा; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मोठी घोषणा..

अमित जाधव - संपादजक

0 2 0 9 7 4

नवीदिल्ली-* तुम्ही महामार्गावरून प्रवास करत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. याचं कारण म्हणजे प्रवास करताना वारंवार टोल भरण्याची कटकट असते. बॅलन्स पाहा, रिचार्ज करा, फास्ट टॅगमधून टोल कट होतो की नाही ते चेक करा आता या कोणत्याच कटकटीला सामोरं जाण्याची आवश्यकता नाही. याचं कारण म्हणजे एकदाच वर्षभराचा पास तुम्हाला काढता येणार आहे.

3000 रुपयांचा पास एकदाच काढून तुम्ही वर्षभर टोल न भरता फिरू शकता. याबाबत केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली आहे. केंद्र सरकारने फास्ट टॅगवर आधारीत एक स्कीम लाँच केली आहे. यामध्ये 3000 रुपयांचा पास काढून तुम्ही टोल भरण्याच्या कटकटीपासून वाचू शकता. ही योजना 15 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणार आहे. ही योजना संपूर्ण देशात एकाच वेळी लागू करण्यात येणार आहे.

3000 रुपयांमध्ये चालकाला 200 ट्रिप करता येतील अशी अट ठेवण्यात आली आहे. ही योजना नॉन कमर्शियल, खासगी वाहनं, कार, जीप आणि व्हॅनसाठी लागू होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी ट्विट करुन याबाबत माहिती दिली. 3000 रुपये किंमतीचा फास्ट टॅग पास सुरू करण्यात येणार आहे. देशातील राष्ट्रीय महामार्गावर अडथळ्याशिवाय प्रवास सुकर व्हावा म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

 

टोल प्लाझावर वाहनांची गर्दी होऊ नये, वाहतूक कोंडी टाळणं आणि वेळ वाचवणे यासाठी हे पर्याय देण्यात आले आहेत. वार्षिक पास योजना लाखो खाजगी चालकांसाठी जलद, सुरळीत आणि चांगल्या प्रवास अनुभवासाठी सुरू करण्यात येत आहे. एकदाच पैसे भरायचे, राज्य आणि राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल प्लाझावर हे चालणार आहे.या योजनेमुळे केवळ पैसे वाचणार नाहीत तर तुमचा वेळ आणि प्रवासाचा अनुभवही सुधारेल. देशभरातील टोल प्लाझावरील जाम, फास्टॅग स्कॅन आणि वारंवार पेमेंट करण्याच्या समस्यांपासून तुम्हाला आराम मिळेल.

 

हा पास राजमार्ग यात्रा अॅप आणि एनएचएआय आणि एमओआरटीएचच्या वेबसाइटद्वारे हा पास घेता येणार आहे. सरकारकडून याची लिंक लवकरच जाहीर केली जाणार आहे. जे दररोज ऑफिस किंवा व्यवसायात प्रवास करतात त्यांना याचा सर्वात मोठा फायदा होईल. याशिवाय, हा लांब ड्राइव्ह प्रेमींसाठी एक बोनस आहे. यामुळे वार्षिक सहलींचे नियोजन स्वस्त होईल. याशिवाय, पारदर्शकता आणि वादांमध्ये मोठी घट होईल. आता तुम्हाला तासन्तास ट्रॅफिकमध्ये उभे राहण्याची किंवा तुमचे वॉलेट पुन्हा पुन्हा रिचार्ज करण्याची गरज नाही. ३,००० रुपयांमध्ये, तुम्हाला एक वर्षाचा “नॅशनल टोल फ्रीडम पास” मिळेल, ज्यामुळे तुमचा खिसा आणि वेळ दोन्ही वाचेल.

 

 

👉

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे