दिवा प्रभाग समिती अंतर्गत ऐक खिडकी योजनेनुसार अर्ज कार्य मर्यादा निश्चित करावी – दिवा वकील संघटना.
अमित जाधव - संपादक
ठाणे, दिवा ता 24 मे : एक खिडकी एक योजनेअंतर्गत घेतलेल्या अर्जाची कार्यसीमा तथा मर्यादा निश्चित करणेबाबत दिवा शहर वकील संघटनेतर्फे दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त प्रीतम पाटील यांना निवेदन देण्यात आले.
एक खिडकी एक योजना चालू केल्याबद्दल दिवा वकील संघटनेने सहायक आयुक्तांचे आभार मानले. यामुळे दिवा प्रभाग समिती अंतर्गत होणारा भ्रष्टाचार बंद किंवा कमी होण्यासाठी मदत होणार आहे. एक खिड़की एक योजना लागू झाली असलली तरी अर्ज निकाली काढण्यास अधिकारी यांचेकडून विलंब होत असल्यामुळे नागरिकांचा थेट संबंध हा अधिकारी यांचेशी होत असल्याने भ्रष्टाचाराला चालना मिळत आहे.तरी आपण प्रत्येक अर्जाची सिमारेखा मर्यादा आखून देण्यात यावी जेणे करून नागरिकाचा थेट संबंध हा विभागीय अधिकारी यांचेशी न होता कामे नियोजनबद्ध व भ्रष्टाचार मुक्त पद्धतीने होईल.
प्रसंगी दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त प्रीतम पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या आठ-दिवसात त्याची कालमर्यादा निश्चित करू असे प्रतिपादन केले आहे. प्रसंगी दिवा वकील संघटनेचे ऍड. रविराज बोटले, ऍड शांताराम इंगळे, ऍड. चेतन भोईर, ऍड. विकास पवार, ऍड मयूर खडतरे, ऍड जे पी तिवारी आदी उपस्थित होते.