Breaking
ब्रेकिंग

दिव्यात शाळांपासून १०० मीटरवर परवांगी नसताना देखील मावा, गुटखा विक्री,पोलिसांनी विशेष मोहीम राबवून करावी कठोर कारवाई.. संतृप्त पालक वर्ग

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे जिल्ह्यातील प्रत्येक शाळांच्या परिसरात १०० मीटर अंतरावर सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास सिगारेट व इतर तंबाखू उत्पादने कायदा २००३ अंतर्गत (कोप्टा) बंदी आहे. तरीदेखील शाळांबाहेर खुलेआम मावा, गुटखा विक्री होतो.कोप्टा कायद्यानुसार सिगारेट आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींना प्रतिबंध घालण्यात आला आहे. तसेच व्यापार, वाणिज्य, नियमन आणि उत्पादन व पुरवठा, वितरणावर देखील बंदी घालण्यात आली आहे.

दिवा शहरात या नियमांचे उल्लंघन सर्रासपणे आणि राजरोसपणे सुरुच आहे. पण, आता सातत्याने अशी विशेष मोहीम राबवून त्या टपरी चालकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश पोलिस आयुक्तांनी स्वतः पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्याची सुरुवात देखील दिव्यात झालेली दिसत नाही अनधिकृतपणे शाळांच्या परिसरात पानटपऱ्या टाकून त्याठिकाणी मावा, गुटखाu व तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेटची विक्री करणाऱ्यांवर थेट गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिस अधीक्षक यांनी सर्व पोलिस ठाण्यांना दिले आहेत.शाळांमधील चिमुकली ही देशाचे भविष्य आहेत. महाविद्यालयीन तरुणांकडून मोठ्या अपेक्षा आहेत. त्यामुळे आता शाळा-महाविद्यालयांच्या परिसरात मावा, गुटखा, तंबाखूजन्य पदार्थांसह सिगारेटची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई होईल.तसे आदेश सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना दिले आहेत. सातत्याने त्यासंदर्भात विशेष मोहीम राबविली जाईल अशी असे काही पालक वर्ग व ज्येष्ठ नागरिकांनी बोलतांना आपल मत व्यक्त केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे