वेश्याव्यवसाय चालविणाऱ्या महिला एजंट जाळ्यात-४ पीडितांची सुटका
ठाणे : वार्ताहर
गरीब आणि असहाय्य महिलांना पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसायात आणून ग्राहकांना पुरविणाऱ्या महिला दलाला ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाने बेड्या ठोकल्या. पोलीस पथकाने चार पीडित महिलांची सुटका केली. गुरुवारी रात्री कोरम मोल जवळ सदरची कारवाई करण्यात आली.
ठाणे गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील याना सामाजिक कार्यकर्ते बिनु वर्गीस यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे हि कारवाई करण्यात आली. पोलीस पथकाने ‘कोरम मॉल जवळ, सर्विस रोड, ठाणे (प) येथे बोगस ग्राहक पाठवुन पंच व पोलीस पथकाने छापेमारी केली. पथकाने एका महिला दलालास अटक केली. तिच्याकडे असलेल्या चार पीडित महिलांची सुटका केली. अटक दलालाच्या विरोधात वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची छापेमारी अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेचे वपोनि महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मपोनिरी प्रिती चव्हाण, मसपोउपनिरी श्रध्दा कदम, सपोउपनिरी सोननीस, सपोउपनिरी चव्हाण, पोहवा. दिवाळे, पोहवा. पाटील, मपोना. खेडेकर, पोअमं. यादव, मपोअंम. थोरात, मपोअंम. लादे, चापोना तेलंगे यांनी सहभाग घेऊन यशस्वीरीत्या पार पडली. आहे.