Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ब्रेकिंग, ठाण्यात कोरोना ऐवजी रेबीज लस दिली ; डॉक्टरसह नर्स निलंबित……

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

ब्रेकिंग, ठाण्यात कोरोना ऐवजी रेबीज लस दिली ; डॉक्टरसह नर्स निलंबित.*
ठाणे, ता 28, ( संतोष पडवळ) : ठाण्याच्या कळवा भागात लस घेण्यासाठी गेलेल्या ऐका लसीकरण केंद्रावर धक्कादायक बाब पुढे आली आहे. सोमवारी कळव्यात लस घेण्यासाठी आलेल्या एका व्यक्तीला कोरोना लस ऐवजी रेबीज लस दिली गेली आहे. याप्रकरणाची ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी दाखल घेत तातडीने आज बैठक बोलवून यातील दोषींवर कारवाई करण्याचे आदेश दिले. त्यानुसार महापालिका प्रशासनाने त्या केंद्रावरील डॉक्टरासह लस देणाऱ्या परिचरिकेवर निलंबनाची कारवाई केली आहे.

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात असलेल्या कळवा, आतकोनेश्वर नगर भागात महापालिकेचे आरोग्य केंद्र आहे. त्या केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्या केंद्रांवर एका व्यक्तीला कोरोना लसीऐवजी रेबीजची लस देण्यात आल्याची बाब पुढे आली.

ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, मंगळवारी महापौर दालनात महापालिकेच्या अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. अशा वारंवार घडणाऱ्या घटनेमुळे महापालिकेची नाहक बदनामी होत आहे. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करा असे आदेश त्यांनी दिले. त्यानुसार महापालिकेच्या माध्यमातून येथील डॉक्टरासह परिचरिकेला निलंबन करण्यात आले आहे.कोरोना लस ऐवजी रेबीज लस दिल्याचा प्रकार ठाण्यात घडला आहे. तर ज्या व्यक्तीला रेबीजची लस दिली गेली आहे.त्या व्यक्तींची प्रकृती उत्तम आहे. तसेच या प्रकरणी डॉक्टर आणि एका परिचरिकेला निलंबित करण्यात आले असल्याची माहिती ठामपा अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांनी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे