गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र
डिझेलच्या भूमिगत पाईपलाईन मधून डिझेल चोरी करताना डिझेलला आग तीन तासांच्या अथक प्रयत्नांने आग विझवन्यास अग्निशमन दलाला यश…..
अमित जाधव-संपादक
*⭕️डिझेलच्या भूमिगत पाईपलाईन मधून डिझेल चोरी करताना डिझेलला आग तीन तासांच्या अथक प्रयत्नांने आग विझवन्यास अग्निशमन दलाला यश.*
ठाणे, ता 5 एप्रिल, (संतोष पडवळ) : ठाण्याच्या शीळ डायघर पोलीस स्टेशन च्या हद्दीतील भूमिगत असलेली भारत पेट्रोलियम कंपनीची डीझेल पाइपलाइन मधून डिझेल चोरी होत असल्याची घटना उजेडात आली आहे. सदर डीजल चोरी करत असताना डीझेल रस्त्यावर आल्याने घटनास्थळी आग लागली सदरची माहिती मिळताच पेट्रोलियम कंपनी, अग्निशमन विभाग आणी आपत्ती व्यवस्थापन टीम यांनी तीन तासांच्या अथक प्रयत्नlने आग विझवून अनर्थ होण्यापासून वाचवले.
शीळ – महापे रोड वर ही 18 सेमीची भूमिगत पाइपलाइन आहे. सदर डिझेल पाईपलाईन मुंबईहुन मनमाडला जाते. सदर लाईन मधून अज्ञात इसमाने डिझेल चोरी करत होता असे निदर्शनास आले आहे.