बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

गरीब बालकाच्या पायला लागलेला चटका व टोचलेला काटा संवेदनाक्षम मनाला बोचला पाहिजे – दात्यांनी व्यक्त केल्या भावना । सुनिल महाजन व विनोदभैय्या जयस्वाल यांच्या स्तुत्य दातृत्वातून ४१ गरजु बालकांना पादत्राणे वाटप ।

अमित जाधव - संपादक

दि २५ , पारोळा
ऐसा तो नही पैर में छाला नही कोई
दुःख ये है के यहाँ देखनेवाला नही कोई
समाजात अशी अनेक बालके आहेत ज्यांना गरीबीमुळे पायाला साधी चप्पलही मिळत नाही . पण जि प शाळा क्र ३ पारोळा शाळेच्या ४१ गरजु विद्यार्थ्यांची ही अडचण मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी सोशल मिडियावर मांडली त्याची त्वरीत दखल घेत शहराचे सुनिल आर महाजन , अध्यक्ष लोकेश फाऊंडेशन तथा संपादक साप्ता कलम प्रहार व विनोदभैय्या जैस्वाल, युवा उदयोजक या मित्रांनी घेतली व आज शाळेच्या ४१ विदयार्थ्यांना छान सुंदर टिकावु अशी पादत्राणे उपलब्ध करून दिली .
या उपक्रमाच्या अध्यक्षपदी निवृत्त मुख्याध्यापक गुणवंतराव शिवदास पाटील , दाते सुनिल आर महाजन व विनोदभैय्या जैस्वाल तसेच प्रमुख पाहुणे म्हणुन प्रकाश शिंपी , विश्वस्त बालाजी संस्थान , राजभाऊ कासार , माजी नगरसेवक , अनिलभाऊ टोळकर , किशोर सोनवणे , जीवनभाऊ मराठे , दिपकमामा कोळपकर , योगेशआण्णा पाटील , पत्रकार, दिलीपभाऊ सोनार , पत्रकार , बाळुभाऊ पाटील , पत्रकार हे उपस्थित होते .
यावेळी इ ४ थी ची विद्यार्थीनी हर्षदा परदेशी इने उपस्थित सर्व मान्यवरांचे पूजन व औक्षण करून स्वागत केले . तीला सर्वांनी रोख बक्षिसे दिले .
यावेळी दोन्ही दात्यांनी ” आज गरजु विद्यार्थ्यांना पायला काटा मोडु नये व उन्हाचा चटका लागु नये म्हणून पादत्राणे देतांना आम्हाला विशेष आनंद होत आहे . खरच अशा गरजु बालकांच्या मदतीसाठी समाजातील सक्षम घटकांनी पुढे यावे व आम्ही यापुढेही आमची ही सेवा अशीच सुरु ठेवु असे प्रतिपादन केले .
कार्यक्रमाचे अध्यक्ष गुणवंतराव पाटील यांनी दोन्ही दात्यांचे अभिनंदन करून खुपच छान उपक्रम घेतला म्हणुन कौतुक केले . या उपक्रमाला उत्तम सहकार्य केले म्हणुन ठाकरे बुट हाऊसचे संचालक समाधान ठाकरे यांचा सत्कार करण्यात आला .
दिपाली पाटील , तरन्नुम सैय्यद , नयना मराठे व राहुल साळुंखे यांनी फलक लेखन , सजावट व रांगोळी काढुन उपक्रमात रंगत आणली .
दात्यांनी सर्व विदयार्थ्यांना कॅटबरी चॉकलेट वाटुन त्यांचा आनंद द्विगुणीत केला .
मुख्याध्यापक मनवंतराव साळुंखे यांनी सुत्रसंचलन तर अर्चना सेवलीकर यांनी आभार मानले .

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे