बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

शिवसेना दिवा शहर आयोजित मंगळागौर स्पर्धा, प्रभागातील महिलांनी मोठया प्रमाणावर सहभाग घ्यावा. मा.नगरसेविका दर्शना चरणदास म्हात्रे…

अमित जाधव - संपादक

ठाणे, दिवा ता 2 सप्टेंबर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या संकल्पनेतून तसेच उप महापौर रमाकांत मढवी याच्या मार्गदर्शनाने तसेच सौ.दर्शना चरणदास म्हात्रे( मा. नगरसेविका) यांच्या तर्फे येत्या दि ४ सप्टेंबर २०२३ रोजी सायंकाळी ४ वा. दिवा शहरासह आजूबाजूच्या परिसरातील महिलांसाठी जागर स्त्री शक्तीचा हे ब्रीद वाक्य ठेऊन मंगळागौर स्पर्धेचे आयोजन दिव्यातील अवधूत हॉल सभागृह येथे करण्यात आले आहे. सदर स्पर्धेत उपस्थित महिलांसाठी अनेक बक्षिसे लुटण्याची संधीउपलब्ध झाली आहे. प्रथम पारितोषिक २५,००० रू. तर द्वितीय पारितोषिक ११,१११ रू.आणि तिसरे पारितोषिक ७,७७७ रू. असून विशेष म्हणजे महीलांसाठी लकी ड्रॉ व आकर्षक मराठमोळ्या पैठणी देखील आहेत .

सदर मंगळागौर स्पर्धेच्या आयोजक मा.नगरसेविका सौ.दर्शना चरणदास म्हात्रे यांनी स्पर्धेत शहरातील महिलांना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे