
नवी मुंबईतील वाशी खाडी पुलावर भीषण अपघात झाला आहे. कारने डंपरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की यामध्ये कारमधील 3 जणांचा मृत्यू झाला. आज पहाटेच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला आहे. घटनेनंतर घटनास्थळी धाव घेत पोलीसांनी मृतदेह हे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मृतांची अधिक माहिती कळू शकली नाही.