अलिबाग दि 21 :–खालापूर तालुक्यातील चौक ग्रामपंचायत अंतर्गत असलेल्या पाच पाढे व वस्त्यातील नानिवली नम्रतावादी हे एक छोटस गाव यापासून इरशाल गड च्या डोंगरावर साधारण एक ते सव्वा तासाच्या अंतरावर असलेल्या आदिवासी पाड्यावर 19 जुलै च्या रात्री दरड कोसळली आणि 48 पैकी जवळपास 39 कुटुंब व त्यांची घरे कोसळलेल्या दरडीतील मातीच्या ढिगार्याखाली सापडले.
रात्री 11 नंतर मोठा डोंगर कोसळल्याचा आवाज ऐकून आदिवासी पाड्याच्या आजूबाजूला असलेल्या वाड्यावर त्यातील ग्रामस्थ आदिवासी सतर्क झाले व या घटनेतून बचावलेल्या सुनील पारधी व कुटुंबाचे नंबराच्या वाढी मध्ये राहणारे मित्र चेतन गणपत वाघे , रोशन वाघे, नरेश अधिक युवक भर पावसात रात्रीच्या अंधारात या आदिवासी पाड्याकडे धावले. त्यांच्यासह जवळपासच्या वाड्यावरील काहीजण घटनास्थळावर पोहोचलेल्यानंतर तेथील घटना पाहिल्यानंतर रात्रीच्या अंधारात देखील भयानक काहीतरी घडले याचा अंदाज येऊ लागला.
या घटनेची वार्ता रात्री शासन व प्रशासनापर्यंत पोहोचली जिल्हाधिकारी डॉ योगेश म्हसे यांच्या सह सर्व यंत्रणा रात्रीच घटनास्थळी दाखल होऊ लागली व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह मंत्रिमंडळातील विविध विभागांचे मंत्री इरशाल वाडीच्या मदत कार्याला गती देण्यासाठी हजर झाले. या वेगात बचाव मदत कार्य सुरू झाल्याने आदिवासी पाड्यावरील दुर्घटनाग्रस्तांचे नमराची वाडी, नानिवली, मोरबा धरणाच्या बाजूला असलेली आंबेवाडी येथील नातेवाईक व मित्रपरिवार काहीसा निर्धास्त झाला.
हे सर्व डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या नंबराची वाडी येथे बचाव कार्यामध्ये आपले आप्तेष्ट नातेवाईक व मित्रपरिवार यांची माहिती घेण्यासाठी सलग दोन दिवसापासून बसून आहेत. या बचाव व मदत कार्यात स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाच दिलेल्या सूचनांमुळे सुरक्षित असलेल्या आदिवासी पाड्यातील नागरिकांना पहिल्यांदा नम्रची वाडी नानिवली येथील जिल्हा परिषद शाळेत सुरक्षित रित्या ठेवण्यात आले आहे. तेथे त्यांची भोजन निवारा यासह व्यवस्था केली तसेच मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन विविध स्वयंसेवी संस्थांनी कपडे आणि साहित्य उपलब्ध करून देण्यात आले.
लक्ष्मी परशुराम बांगारे यांनी सांगितले की माझ्या सासरे जवळपास 15 लोकांचे कुटुंब आदिवासी पाड्यात राहत होते. या पिल्या पारधी यांच्या कुटुंबातील जवळपास सात व्यक्ती दुर्घटनेमध्ये दिसेनासा झाल्या आहेत अजूनही आम्हाला त्या बाबत आशा असल्याने आम्ही इथे थांबलोय. सरकारने मोठ्या प्रमाणात शोध घेण्याचे काम चालू केले आहे त्या घटनास्थळावर पती व काही नातेवाईक जाऊन अजूनही काही माहिती मिळते का हे पाहत आहेत.लक्ष्मी भंगारे या जिल्हा परिषद शाळेजवळ थांबून वरील बचाव पथकाकडून काही माहिती येते का याची मोठ्या आशेने वाट बघत होत्या.मुसळधार पावसाची पर्वा न करता युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरु आहे. त्यामुळे परिसरात शासन आपल्या पाठीशी खंबीर आहे हा
विश्वास निर्माण झाला आहे.
0000



