
यंदा 14 दिवस दिवाळीची सुट्टी असणार आहे. सध्या काही शाळांमध्ये पहिल्या सत्राची परीक्षा सुरु आहे, तर काही शाळांमध्ये या आठवड्यात सुरु होईल. परीक्षेनंतर 28 आक्टोबरपासून दिवाळीची सुट्टी आहे. शिक्षण विभागाच्या कॅलेंडरनुसार 9 नोव्हेंबरपर्यंत दिवाळी सुट्टी आहे. पण, 10 नोव्हेंबरला रविवार असल्याने शाळा 11 नोव्हेंबरला उघडतील. दरम्यान यंदा दहावीची 21 फेब्रुवारी तर बारावीची परीक्षा 19 फेब्रुवारीपासून होईल.