Breaking
ब्रेकिंग

अधिस्वीकृती समितीवर धर्मादाय, न्यास अंतर्गत नोंदणी असलेल्या सेवाभावी संस्थांना पत्रकार संघटना गृहीत धरून केलेल्या चुकीच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी, ठाणे जिल्हा ,महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे निवेदन…..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे ता १७ जुले : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई चे प्रदेशाध्यक्ष वसंत मुंडे, महासचिव विश्वासराव आरोटे, राज्य संघटक संजय भोकरे, कोकण विभागीय अध्यक्ष नितिन शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सोमवार दिनांक १७ जुलै २०२३ रोजी पत्रकारांनी ठाणे जिल्हाधिकारी, निवासी जिल्हाधिकारी, मुख्यमंत्री सचिव, ठाणे यांना मुख्यमंत्री, जिल्हा माहिती अधिकारी ठाणे यांच्या नावे निवेदन देऊन, अधिस्वीकृती समितीवर धर्मादाय, न्यास अंतर्गत नोंदणी असलेल्या सेवाभावी संस्थांना पत्रकार संघटना गृहीत धरून केलेल्या चुकीच्या नियुक्त्या रद्द करण्याची मागणी केली आहे.

प्रसंगी ठाणे शहर अध्यक्ष जितेंद्र पाटील, उप‍ाध्यक्ष सुबोध कांबळे, मिनल पवार, सल्लागार सतिशकुमार भावे, राजन पाटील, प्रसिद्धी प्रमुख अमित गुजर, संदीप पालवी, कार्यकारी सदस्य किरण अन्वेकर, ख्वाजा शेख व यांच्या सह ठाण्यातील अनेक पत्रकार उपस्थित होते. महाराष्ट्र राज्यात सोमवारी पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी व जिल्हा माहिती अधिकारी यांना निवेदन देण्यात येत आहे.सरकारने दखल घेऊन चुकीच्या पध्दतीने झालेल्या नियुक्त्या रद्द कराव्यात अन्यथा लोकशाही मार्गाने पण आंदोलन तीव्र करण्यातचाही निर्णय घेण्यात आला आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे