जर तुम्ही शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड तुम्ही पुसून टाकणार असाल तर महाराष्ट्राच्या धरतीवरुन तुमचं नामोनिशान पुसून टाकू, … उद्धव ठाकरे गरजले
अमित जाधव - संपादक

राज्याच्या जनतेच्या मनात जे आहे ते होऊ नये मराठी माणसाची शक्ती एकत्र येऊ नये म्हणून यांच्या मालकाचे नोकर इकडे गाठी भेटी घ्यायला लागले, हॉटेलमध्ये भेटत आहेत.मालकांचे नोकर तुम्ही जर का मुंबईवर तुम्हाला ताबा मिळाला नाही, पुन्हा मुंबई मराठी माणसाच्या ताब्यात गेली तर मालकाच्या मित्राचं कसं होणार, अदानीचं कसं होणार त्याच्यामुळं शेठजींचे नोकर, आणि शेठजींच्या नोकरांचे नोकर जे आज नालायकपणे वर्धापन दिन साजरा करत आहेत. अरे तुला काय करायचं तुला नाही होत, आमचं काय करायचं ते आम्ही बघू, असं आव्हान उद्दव ठाकरे यांनी दिले.
जर तुम्ही शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड तुम्ही पुसून टाकणार असाल तर महाराष्ट्राच्या धरतीवरुन तुमचं नाव पुसून टाकणार आहोत. भाजपचं नामोनिशान पुसून टाकू, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी दिला. माझी तयारी तुम्हाला सांगतो, 1992-93 साली दंगा झाला होता.देशद्रोह्यांच्या विरुद्ध शिवसैनिक रस्त्यावर उतरले होते. त्यावेळी एक व्यक्ती बाळासाहेब ठाकरेंकडे आली होती, अशी आठवण उद्धव ठाकरे यांनी सांगितली. गद्दारांसमोर उभा आहे व मी म्हणतोय…कमॉन किल मी, तुम्ही अंगावर येणार असाल तर अॅम्ब्युलन्स घेऊन यायचं, येताना सरळ याल जाताना आडवे व्हाल, असा इशारा देखील उद्धव ठाकरे यांनी दिला. आपल्याला भांडून चालणार नाही. मुंबईत हिंदू- हिंदूमध्ये मारामाऱ्या लावायच्या, हिंदी सक्ती करायची असेल तर देवेंद्र करुन बघा, ज्या हिंदी लोकांना 1993 मध्ये वाचवलं, त्यांना आपल्या विरुद्ध उभं करतात. हिंदी सक्तीवरुन मुंबईत मराठी अमराठी वाद लावायचा आणि ते भ्रष्टाचार करायला मोकळे असं उद्धव ठाकरे म्हणाले.