अन्न पुरविणा-या ठेकेदारावर कठाेर कारवाई न झाल्यास भाजपाच्या महीला रस्त्यावर उतरुन कारवाई करू – सपना भगत यांनी दिला इशारा
अमित जाधव - संपादक
दिवा – आम्ही साबेगावातील शाळेत निकृष्ट दर्जाच्या खिचडी पुरविणा-या ठेकेदार कारवाई करा असे पालिकेला सांगितले होते मात्र आज पुन्हा आगासन येथील महापालिकेची शाळा क्र.८८ येथे ४० मुलांना अन्नातून विषबाधा झालेली आहे,ही घटना मुलांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण करणारी असून अन्न पुरविणा-या ठेकेदारावर कठोर कारवाई करा अन्यथा भारतीय जनता पार्टीच्या महीला रस्त्यावर उतरुन कारवाई करतील असा इशारा सपना भगत यांनी दिला आहे.
त्या माध्यमांशी बोलताना म्हणाल्या की, तीन महिन्यापुर्वी साबेगाव येथील महानगरपालिकेच्या शाळेत असेच निकृष्ट दर्जाचे अन्न मुलांना देण्यात येत होते.त्या ठिकाणी कोणतीही स्वच्छता बाळगळी जात नव्हती.मुले आजारी पड़ूं शकतात याबाबत तक्रार आम्ही केली होती.परंतु या घटनेकडे पालिका प्रशासनाकडून कोणतीही दखल घेण्यात आली नव्हती.प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे आज आगासन येथील मुलांना पुरविण्यात येणा-या खिचडीत चक्क मेलेली पाल सापडली आहे.या पालीमुळे अनेक मुलांना विषबाधा होऊन हाॅस्पिटलमध्ये दाखल करावे लागले आहे.
दरम्यान या घटनेमुळे दिवा शहरात एकच खळबळ उडाली आहे.अन्न पुरवठा करणा-या ठेकेदारावर कारवाई न झाल्यास भारतीय जनता पार्टीच्यावतीने रस्त्यावर उतरुन ठेकेदारावर कारवाई केली जाईल असा इशारा भारतीय जनता पार्टीच्या महीला मोर्चाच्या अध्यक्षा सौ सपना रोशन भगत यांनी दिला आहे .



