Breaking
ब्रेकिंग

शाळांना सुट्टी असतानाही साबे गावातील शाळेबद्दल गैरसमज पसरवणारे राजकारण करण्यात दंग- निलेश पाटील

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

दिवा:- ठाणे महापालिकेच्या शाळांना सुट्टी असतानाही विद्यार्थी ऊन पावसात धडे घेत असल्याचे तारे तोडणारे ठाकरे गटाचे सचिन पाटील हे फक्त प्रसिद्धीसाठी लोकांना चुकीची माहिती देत असून महापालिकेच्या शाळेचे लोकार्पण सर्व कामे पूर्ण झाल्यावर योग्य वेळी होईल असा विश्वास शिवसेनेचे निलेश पाटील यांनी व्यक्त केला आहे.

साबे गावातील महापालिकेच्या शाळेची इमारत ठामपा मार्फत उभारण्यात आली आहे.या इमारतीचे लोकार्पण महापालिकेमार्फत नियोजित केले जाते. महापालिकेच्या ठरलेले कार्यक्रमा प्रमाणे हे लोकार्पण योग्य वेळी होईल मात्र मुलांना ऊन वारा पावसात शैक्षणिक धडे घ्यावे लागतात असे मे महिन्याच्या सुट्टीत सांगून लोकांची दिशाभूल करणारे ठाकरे गटाचे सचिन पाटील केवळ राजकारण करत असल्याचा टोला निलेश पाटील यांनी लगावला आहे. ज्यांना घराजवळील शाळेला सुट्टी आहे हे माहीत नाही ते केवळ प्रसिद्धी साठी लोकांमध्ये गैरसमज पसरवत असल्याचे निलेश पाटील यांनी म्हटले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे