दिव्यात भाजप च्या पक्ष प्रवेश मेळाव्यात युवा व महिला वर्गाचा तुफान प्रतिसाद,500 पेक्षा जास्त नागरिकांचा भाजप मध्ये प्रवेश…..
अमित जाधव-संपादक
बेधडक ठाणे न्युज
दिवा:-जे भाजप सोडून गेले त्यांना दिव्यातील जनतादिव्यात जागा दाखवेलच मात्र येणाऱ्या काळात दिव्यात येथील जनता परिवर्तन घडवणार असून भाजपचे नगरसेवक निवडून येणार असल्याचे भाजप आमदार संजय केळकर …….
दिवा:-जे भाजप सोडून गेले त्यांना दिव्यातील जनता जागा दाखवेलच मात्र येणाऱ्या काळात दिव्यात येथील जनता परिवर्तन घडवणार असून भाजपचे नगरसेवक निवडून येणार असल्याचे भाजप आमदार संजय केळकर यांनी सांगितले. कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना ते बोलत होते.
यावेळी भाजपचे जेष्ठ नेते माजी कॅबिनेट मंत्री ,श्री जगन्नाथ पाटील,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस आमदार रविंद्रजी चव्हाण,ठाणे शहर आमदार
संजय केळकर,कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार तथा ठाणे जिल्हाध्यक्ष ऍड निरंजन डावखरे,ओबीसी मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्ष सचिन केदारी,ओबीसी मोर्चा कल्याण जिल्हाध्यक्ष श्री लक्ष्मण पाटील,युवा मोर्चा अध्यक्ष ठाणे जिल्हा
श्री सारंग मेढेकर,उत्तर भारतीय मोर्चा ठाणे जिल्हाध्यक्षश्री शैलेश मिश्रा,संघटक सरचिटणीस विलास साठे,सोशल मीडिया ठाणे जिल्हाध्यक्ष आलोक ओक,शिल मंडळ अध्यक्ष बाळाराम पाटील व्यासपीठावर उपस्थित होते.रविवारी दिव्यात भाजपचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला.या मेळाव्याला भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिवा शहरातील भाजप मंडळ अध्यक्षपदी रोहिदास मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली. दिवा वासीयांच्या मूलभूत असणाऱ्या लाईट, पाणी, सुलभ सौचालय, हॉस्पिटल अश्या अनेक समस्या सोडवण्यासाठी भाजप कटीबध असेल असे प्रतिपादन रोहिदास मुंडे यांनी यावेळी केले.यावेळी ओबीसी मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष विनोद भगत यांच्या माध्यमातून निलेश गोवर्धन भगत आणि त्यांचे सहकारी यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला. जिल्हा कार्यकारणी सदस्य विजय भोईर यांच्या नेतृत्वात शेकडो लोकांचा जाहीर प्रवेश करण्यात आला. कार्यकारणी सदस्य गणेश भगत व सीमा भगत यांच्या नेतृत्वात प्रशांत नगर फेस तीन ,चार पाच सहा व दिवा वेस्ट येथील शेकडो नागरिकांच्या जाहीर प्रवेश करण्यात आला.नरेश पवार आणि रेशमा पवार यांच्या नेतृत्वात गणेश नगर बेडेकर नगर येथील नागरिक यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला.त्याचबरोबर युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर यांच्या नेतृत्वात शेकडो युवकांचा जाहीर प्रवेश, ओबीसी मोर्चा दिवा अध्यक्ष रोशन भगत व सपना भगत यांच्या नेतृत्वात मुंब्रा देवी कॉलनी आणि श्लोक नगर येथील शेकडो नागरिकांच्या जाहीर प्रवेश करण्यात आला.
यावेळी प्रमुख नेत्यांच्या उपस्थिती मध्ये दिवा मंडळाच्या 500 लोकांची पद नियुक्ती जाहीर करण्यात आली. दिवा मंडल अध्यक्षपदी रोहिदास मुंडे, संघटक सरचिटणीस दिलीप भोईर, सरचिटणीस समीर चव्हाण ,सरचिटणीस युवराज यादव ,युवा मोर्चा अध्यक्ष सचिन भोईर ,ओबीसी मोर्चा अध्यक्ष रोशन भगत ,उत्तर भारतीय अध्यक्ष अजय सिंग, व्यापारी सेल अध्यक्ष जयदीप भोईर माजी सैनिक सेल, अध्यक्ष आनंदा पाटील डॉक्टर सेल अध्यक्ष विद्यासागर दुबे ज्येष्ठ नागरिक सेल अध्यक्ष राम राज मिश्रा वार्ड अध्यक्ष प्रकाश पाटील विभागीय अध्यक्ष नागेश पवार तसेच सुधीर म्हात्रे मारुती गायकर यांचा अटल सन्मान करण्यात आला.प्रसंगी अनेकांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर काही नवनिर्वाचित महिला व पुरुष कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. सदर मेळावा प्रसंगी भाजपचे अशोक पाटील, विजय भोईर,नरेश पवार, गणेश भगत, सचिन भोईर,रोशन भगत,अंकुश मढवी, युवराज यादव,समीर चव्हाण, जयदीप भोईर,नागेश पवार,वीरेंद्र गुप्ता,प्रशांत अबोणकर, माजी महिला अध्यक्षा सौ.सीमा भगत,राजश्री मुंडे,रेश्मा पवार, मंगला राणे, रीना यादव, संगीता भोईर,शीला गुप्ता, आदींसह सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
दिवा:-जे भाजप सोडून गेले त्यांना दिव्यातील जनतादिव्यात जागा दाखवेलच मात्र येणाऱ्या काळात दिव्यात येथील जनता परिवर्तन घडवणार असून भाजपचे नगरसेवक निवडून येणार असल्याचे भाजप आमदार संजय केळकर …….

