ब्रेकिंग
आसनगाव रेल्वे स्थानकात लोकल मध्ये प्रवाशाला मिळाली बॅग,अबब निघाले 20 लाख रुपये…
अमित जाधव - संपादक

आसनगाव मुंबईतील एका लोकलमध्ये 20 लाख रुपयांची रोकड असलेली बॅग सापडली आहे. या बॅगेच्या मालकाचा पोलीस शोध घेत आहे. आसनगाव रेल्वे स्थानकावर कसारा- सीएसएमटी लोकलमध्ये रविवारी रात्री ही बॅग एका प्रवाशाला आढळून आली. बेवारस बॅग असल्याने याची माहिती संबंधित प्रवाशाने कल्याण रेल्वे पोलीसांनी दिली. या बॅगेची तपासणी केली असता वीस लाख रुपये आढळून आले. या प्रकरणी कल्याण रेल्वे पोलीस अधिक तपास करत आहेत.