ब्रेकिंग
राज्यातील सर्व पत्रकारांना राष्ट्रीय महामार्गावर टोलमाफी देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केल्याची बातमी व्हायरल,खरी की फेक..!
अमित जाधव -संपादक
राज्यातील सर्व पत्रकारांना राष्ट्रीय महामार्गावर टोलमाफी देण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी केल्याची बातमी व्हायरल होत आहे. पण ही बातमी खोटी असल्याचे समोर आले आहे. एका वर्तमानपत्राने एक एप्रिल रोजी एप्रिल फूल करण्यासाठी ही बातमी दिली होती. अनेक वृत्तपत्रांनी देखील ही बातमी आपल्या वेबसाईटवर प्रसिद्ध केली. पण ही बातमी खरी नाही. रस्ते विकास मंत्रालयाने असा कोणताही अध्यादेश काढला नाही.