ब्रेकिंग
महाराष्ट्राची पहिली पसंती असलेला वडापाव जगप्रसिद्ध झाला,टेस्ट ऐटलसने जगातील 50 सर्वोत्तम सँडविचची यादी जारी…
अमित जाधव - संपादक

जगातील सर्वोत्तम सँडविचमध्ये वडापाव
मुंबईकरांची पहिली पसंत असलेला वडापाव जगप्रसिद्ध झाला आहे. टेस्ट ऐटलसने जगातील 50 सर्वोत्तम सँडविचची यादी जारी केली आहे. यामध्ये वडापावचाही समावेश करण्यात आला आहे. लेबनान येथील शॉरमा 4.6 रेटिंगसह पहिल्या स्थानावर आहे. तर मुंबईतील प्रसिद्ध वडापाव 4.2 रेटिंगसह 39 व्या स्थानावर आहे. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर बान मी (व्हियतनाम) आणि तिसऱ्या स्थानावर तुर्किएच्या टॉम्बिक डोनर यांचा समावेश आहे.