बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

रविवारीही ठाणे महापालिका आयुक्तांचा दौरा तलाव सुशोभिकरण, रस्ते, साफसफाई कामाची केली पाहणी…

अमित जाधव-संपादक

*⭕️रविवारीही ठाणे महापालिका आयुक्तांचा दौरा तलाव सुशोभिकरण, रस्ते, साफसफाई कामाची केली पाहणी.*

२२५ पोस्टर्स व बॅनर्सवर कारवाई

ठाणे (२७ मार्च, संतोष पडवळ ) महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी आज रविवारच्या दिवशीही सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपर्यंत शहराच्या विविध भागांना भेटी देवून तलाव सुशोभिकरण, रस्ते आणि साफसफाई कामाची पाहणी केली. या दौऱ्यामध्ये आयुक्तांनी सर्व अधिकाऱ्यांना साफसफाई, अनधिकृत बॅनर्स, पोस्टर्स निष्काषणाची कारवाई अधिक तीव्र करण्याचे आदेश दिले. दरम्यान आज शहरातील जवळपास २२५ अनधिकृत पोस्टर्स आणि बॅनर्स काढण्यात आले.

आज सकाळी ७ वाजलेपासून महापालिका आयुक्त डॅा. शर्मा यांनी ब्रम्हांड चौक, हवाई दल स्टेशन, कापुरबावडी, माजिवडा जंक्शन, अलीग चेंबर्स, फ्लॅावर व्हॅली, तीन हात नाका सेवा रस्ता, मुलुंड चेक नाका, वागळे इस्टेट, मॅाडेल चेक नाका, वागळे इस्टेट मेन रोड, वर्तकनगर, उपवन तलाव, मासुंदा तलाव आदी ठिकाणांची पाहणी केली.

सकाळी सात ते दुपारी दोन वाजेपेर्यंत हा पाहणी दौरा सुरू होता. या दौऱ्यामध्ये महापालिका आयुक्तांनी नियमित साफसफाई, रस्ते दुभाजकांमधील झाडे व त्यांची निगा व देखभाल, फुटपाथ मोकळे व साफ ठेवणे आदी कामे प्राधान्याने करण्याच्या सूचना दिल्या. त्याचबरोबर अनधिकृत पोस्टर्स – बॅनर्स, फुटपाथवरील टपऱ्या काढण्याची कारवाईही नियमितपणे करावी अशा सूचना त्यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना देण्यात आल्या.

या पाहणी दौऱ्यामध्ये महापालिका आयुक्तांसमवेत अतिरिक्त आयुक्त(१) संदीप माळवी, उप आयुक्त अशोक बुरपल्ले, अतिरिक्त नगर अभियंता अर्जुन अहिरे आणि सर्व सहाय्यक आयुक्त सहभागी झाले होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे