Breaking
गुन्हेगारीब्रेकिंगमहाराष्ट्र

ठामपा पुरस्कृत ‘उत्सव 75 ठाणे’ महोत्सवाचे गडकरी रंगायतन येथे दिमाखात उद्घाटन…

अमित जाधव-संपादक

0 2 0 9 7 4

ठामपा पुरस्कृत ‘उत्सव 75 ठाणे’ महोत्सवाचे दिमाखात उद्घाटन

ठाणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त ठामपा पुरस्कृत ठाण्यातील विविध संस्थांच्या माध्यमातून साजरा करण्यात येणाऱ्या ‘उत्सव 75’ ठाणे या दिमाखदार महोत्सवाचे उद्घाटन शुक्रवारी राम गणेश गडकरी रंगायतन येथे झाले. प्रशासक तथा महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा, जिल्हाधिकारी रार्जेश नार्वेकर, सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी व उत्सव 75 ठाणेचे स्वागताध्यक्ष नरेश म्हस्के व विविध संस्थांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त दिनांक 13 ते 15 ऑगस्अ 2022 या कालावधीत ठाण्यात उत्सव 75 ठाणे हा महोत्सव साजरा होत आहे. एकाच शहरात 20 ठिकाणी जवळपास 50 हून अधिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाणेकरांनी ठाणेकरांसाठी ठाणे शहरात भरविलेला हा महोत्सव असून या महोत्सवात विविध ठाणेकर मान्यवर सहभागी झाले आहे.

ठाणे शहराला सांस्कृतिक उपराजधानी म्हटले जाते. या शहरात जरी उंचच उंच इमारती असल्या तरी शहराची उंची ही इमारतीवरुन नाही तर त्या शहरात असलेली वाचनालये, साहित्यिक, सांस्कृतिक चळवळ यावरुन ठरत असते. ठाणे शहरात आज अनेक कलावंत राहतात, कलाप्रेमी ठाणेकर अशी उपमा नेहमीच रंगकर्मीकडून ठाण्याला मिळत असते. या सर्व कलाप्रेमी ठाणेकरांमुळेच हा महोत्सव भव्यप्रमाणात साजरा होत असून प्रत्येक कार्यक्रमाला जरी गर्दी कमी असली तरी त्या गर्दीत दर्दी ठाणेकर आहेत. या उत्सव 75 ठाणे महोत्सवाला ठाणे महापालिकेने सहकार्य दिले असून हा महोत्सव आता लोकोत्सव झाला आहे असे या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष नरेश म्हस्के यांनी स्वागताध्यक्षपर भाषणात नमूद केले. तसेच 15 ऑगस्टपर्यत होणाऱ्या कार्यक्रमांना देखील ठाणेकरांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम असून सर्वच कार्यक्रमांना नागरिक गर्दी करत आहे. या महोत्सवात अनेक कार्यक्रम असल्यामुळे नागरिकांना देखील स्वातंत्र्य आहे की कोणते कार्यक्रम पाहायचे असेही उद्घाटनपर भाषणात बोलताना प्रशासक तथा आयुक्त डॉ.‍विपिन शर्मा यांनी नमूद केले. भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव हा देशभर साजरा होत आहे. परंतु ठाणे शहरात साजरा होत असलेला हा महोत्सव प्रत्येक ठाणेकराच्या लक्षात राहिल असाच असल्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी नमूद केले. तर अतिरिक्त सहपोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त कविता सादर करुन रसिकांची दाद मिळविली.

राम गणेश गडकरी रंगायतन येथे उद्घाटनासाठी येणाऱ्या मान्यवरांना पोलीस बॅण्ड पथकाने अनोख्या पध्दतीने मानवंदना देवून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तर कार्यक्रमाच्या उदघाटनानंतर शहनाईवादक पं.औरंगाबादकर यांच्या शहनाईवादनाने व तबलावादक मुकुंद देव यांच्या तबलावादनाने कार्यक्रमात आणखीनच रंगत आणली. तद्नंतर मुलाखतकार अशोक वानखेडे यांनी घेतलेल्या माजी व्हाईस ॲडमिरल एव.व्ही. भोकरे, माजी एअर मार्शल अरुण गरुड, माजी लेफ्टनंट जनरल राजेंद्र निभोरकर यांच्या मुलाखतींनाही रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे