आज दिनांक २५/०९/२०२४ रोजी २१:०१ वाजताच्या सुमारास आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडे प्राप्त झालेल्या घटनेच्या माहितीनुसार वाय जंक्शन पुढे, मुंब्रा बायपास, मुंब्रा, ठाणे या ठिकाणी मुंब्रा टोलनाक्याच्या पुढे शीळकडून ठाणे कडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली होती.सदर घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान ०१ – इमार्जन्सी टेंडर सह तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१- पिकअप वाहनासह, मुंब्रा प्रभाग समिती निहाय आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी ०१ – जे.सी.बी. मशीनसह उपस्थित होते. सदर घटनेत कोणालाही दुखापत नाही.सदर घटनास्थळी रस्त्यावर कोसळलेली दरड जे.सी.बी. मशीनच्या साहाय्याने बाजूला करण्यात आली असून रस्ता वाहतुकीसाठी पुर्णपणे मोकळा करण्यात आला आहे.
सदर ठिकाणी उर्वरित भागही धोकादायक स्थितीत असल्याने सदरची माहिती वनविभागामध्ये कळविण्यात आली असून संबंधिताना कार्यवाहीच्या सूचना देण्यात आल्या आहेत असे यावेळी कळविण्यात आले



