Breaking
ब्रेकिंग

बाबासाहेबांचा फोटो फाडल्या कारणाने भारतीय जनता पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन ,दिव्यात देखील अव्हांडाविरोधात निषेध आंदोलन….

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 9

ठाणे, दिवा ता ३० मे :भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार व भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी दीनदुबळ्यांच्या हक्कासाठी महाडच्या चवदार तळ्यावर ऐतिहासिक आंदोलन केले होते. त्याच ठिकाणी माजी मंत्री, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृती दहन आंदोलन करताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो मनस्मृतीच्या निषेधार्थ फाडला. फोटो अनावधानाने फाडला की मुद्दाम फाडला ? हे भविष्यात कळेलच परंतु आपल्या हातात फोटो कोणता आहे ? आणि आपण तो फाडत आहे याची जाण नेते महोदयांना नसावी का ? हातात बाबासाहेबांचा फोटो असताना तो अनावधानाने का फाटला गेला ? असे अनेक प्रश्न सामान्यांना पडत आहेत. सरकार शालेय अभ्यासात मनुस्मृतीचा समावेश करत असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन जितेंद्र आव्हाड यांनी केले होते. परंतु त्यांचे हे आंदोलन त्यांनाच उलटे पडले असे दिसत आहे.

बाबासाहेबांचा फोटो फाडल्या कारणाने भारतीय जनता पार्टीने संपूर्ण महाराष्ट्रभर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निषेध आंदोलन केले.

आज भारतीय जनता पार्टीने दिव्यातील साबेगाव रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारका जवळ निषेध आंदोलन केले. याप्रसंगी दिवा भाजप मंडळ अध्यक्ष सचिन भोईर, ठाणे जिल्हा युवा मोर्चा सरचिटणीस सतीश केळशीकर, दिवा महिला अध्यक्षा सपना भगत तसेच ठाणे जिल्हा कार्यकारणी सदस्य रोशन भगत, युवराज यादव, संजय सिंह, विजय वाघ, श्रीधर पाटील, नीलम मिश्रा, सुजल चव्हाण यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 9

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे