बेधडक ठाणे न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे.

ब्रेकिंग

दिव्यात भरधाव रिक्षाच्या धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा बळी..

अमित जाधव - संपादक

दिव्यात भरधाव रिक्षाच्या धडकेत वृद्धाचा बळी…

ठाणे, दिवा ता १ एप्रिल : दिव्यात भरधाव रिक्षाच्या धडकेत ७० वर्षीय वृद्धाचा बळी गेल्याची घटना घडली आहे. दिवा स्टेशनच्या मुख्य रस्त्यावर दुपारी ३:३० वाजता श्यामनारायण गुप्ता (वय ७०) हे मॉर्डन किचन हॉटेल समोरून रस्त्यावर जात असताना दिवा स्टेशनकडे जाणारी भरधाव रिक्षा क्र MH 04, HZ 0164 ने जोरदार धडक दिल्याने गंभीर जखमी होऊन बेशुद्ध झाले असता त्यांना मुंब्रा येथील काळसेकर हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. प्रसंगी परिस्थिती नाजूक झाल्याने गुप्ता यांना के ई एम हॉस्पीटल, मुंबई येथे हलविण्यात आले. उपचारा दरम्यान त्यांचं निधन झाले असून प्रकरणी मयत गुप्ता यांचा मुलगा अविनाश गुप्ता यांनी आरोपी विरोधात परळ भोईवाडा येथे पोलीस तक्रार केली असून प्रकरण मुंब्रा पोलीसात वर्ग करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे