म न ढोकळे यांची जनसंपर्क अधिकारी महाराष्ट्र राज्य पदी नियुक्ति व कार्यकर्ता सभेत कामकाजाचा आढावा व पुढील कामकाजाबाबत मार्गदर्शन व प्रबोधन करण्यात आले. सभेचे अध्यक्षपद संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री विजयजी कुराडे यांनी भूषविले.
माननीय डॉक्टर शुभांगी रत्नपारखी, राष्ट्रीय महिला जनसंपर्क अधिकारी यांनी आपल्या अभ्यासपूर्ण मार्गदर्शनात महत्त्वाचे मुद्दे विशद केले त्यात आपल्या संस्थेच्या माध्यमातून कायदा हातात न घेता समाजकार्य करण्याचा सल्ला दिला तसेच पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी पोलीस मित्र बना, मोहल्ला समितीत कार्य करा, शांतता भंग होतो आहे अशा ठिकाणी शांतता राखली जाईल हे पहा, तसेच मुलींची छेड काढली जात असेल तर मुलींची बाजु घेवुन त्यांना संरक्षण द्या. असे महत्त्वाचे मुद्दे विशद केले. तसेच आपल्या संस्थेच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी नाशिक येथे आयोजित होणाऱ्या कुंभमेळ्यात भाग घेऊन स्वयंसेवकाची भूमिका पार पाडावी असे सांगितले .
कार्यक्रमास गुजरात राज्य दपरिसरातून यशवंत ओमा वसावे, सुनील गुलाबसिंह पाडवी, चंपक फाटूभाई वसावे व गिरीधर विजय पाडवी उपस्थित होते. त्यांचा



