राष्ट्रामाता राजमाता माँसाहेब जिजाऊ जयंती निमित्त लहान मुलांच्या वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..
अमित जाधव - संपादक
खेड तालुका कोकण रहिवाशी मंच दिवा शहर या संस्थेच्या वतीने माँसाहेब जिजाऊ जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले वाडीबेलदार गावचे सुपुत्र ह. भ. प. लक्ष्मण महाराज पवार, तसेच खेड तालुका रहिवाशी मंच मुंबई चे पदाधिकारी रघुनाथ निकम साहेब तसेच संस्थेचे प्रमुख सल्लागार मंगेश शेलार साहेब यांच्या हस्ते माँसाहेब जिजाऊमातांना व छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून तसेच उपस्थित सर्वच मायमाउलींच्या वतीने माँसाहेब जिजाऊंना आरती ओवाळण्यात आली.
जेष्ठ नागरिक म्हणून गंगाबाई केशव उतेकर, ललिता दादाखोत निकम, नथुराम कदम या मातापित्यांचे आशीर्वाद घेऊन कार्यक्रमात मुलांच्या वकृत्व स्पर्धेला सुरवात करण्यात आली. वकृत्व स्पर्धेला खूप चांगला प्रतिसाद मिळाला 21 मुलांनी आपली कला या ठिकाणी सादर केली तसेच दहा मुलींनी राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा केली होती अतिशय उत्साहात आणि आनंदात जयंती साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुख्य प्रवक्ता श्री प्रवीण उतेकर साहेब व सहसचिव विशाल देवळे साहेब या दोघांनी केले. या कार्यक्रमासाठी ज्या ज्या सहकारी बांधवांनी मेहनत घेऊन कार्यक्रम यशस्वी केला अशा सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .



