जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था च्या माध्यमातून स्मिता सभाजी जाधव यांचे प्रभागातील नागरिकांसाठी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन ….
अमित जाधव - संपादक
जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र
ठाणे शहर विभाग
मोफत आरोग्य तपासणी व सर्व रोगनिदान शिबिर आणि जेष्ठ समाजसेवक श्री. संभाजी जाधव व समाजसेविका सौ. स्मिता जाधव यांच्या नियोजनातून बी आर नगर दिवा येथे भव्य- दिव्य शिबिराच आयोजन आज रोजी ९ जुलै सकाळी ९ वाजल्यापासून सुरु झाल.
जिजाऊ संस्था ही एक संस्था नसून आधार देणारी आधारवड आहे. जी सर्व समाजघटकांतील निराधार आणि गरजू लोकांना मदतीचा हात देणारी, सर्वसमाज घटकांना सक्षम बनवून त्याच आयुष्य दैदीप्यमान बनवणारी कामधेनू आहे. या संस्थेचे महाराष्ट्र राज्यचे अध्यक्ष श्री. निलेश सांबरे यांनी संस्थेची स्थापना करून अनेक समाजउपयोगी उपक्रम हाती घेतले आहे जिजाऊ संस्था महिला सक्षमीकरण आणि सबलीकर यावर विशेष भर देते. महिलांसाठी शिलाई मशिन, मेहंदी कोर्स , रांगोळी कोर्स मोफत देते. मुलांसाठी युपीएससी आणि एमपीएससीचे कोर्सेस मोफत देते.गरजू लोकांच्या वरील सर्व शस्त्रक्रिया मोफत करते. मतिमंद मुलांसाठी जिजाऊ संस्था मोफत शिक्षणही देते. जिजाऊ संस्थेचे पालघर येथे हॉस्पिटलही आहे , त्यामार्फत लाखो गरजवंत लोक आपल्या शस्त्रक्रिया करून आज आनंदी जीवन जगत आहेत.असे यावेळी स्मिता संभाजी जाधव यांनी बोलताना स्पष्ट केलं.
खरच अभिमानास्पद गोष्ठ म्हणजे श्री. संभाजीदादा जाधव यांच्या या मोफत आरोग्य शिबिरास जवळजवळ ४०० पेक्षा जास्त लोकांनी सहभाग नोंदवला आणि मोफत चष्मे आणि आरोग्य चिकित्सेचा लाभ घेतला. मनापासून आभार संभाजी दादा जाधव व सौ. स्मिताताई जाधव यांचे , त्यांच्या संकल्पनेतून हे शिबिर साकार झाल. विशेष सहकार्य, श्री.रामकृष्ण पाटकर ,श्री. सौदागर इंगवले, श्री.परीक्षित पानसरे, ओमकार पानसरे,श्री. विलास उत्तेकर, श्री. अनिल पवार यांचे लाभले, त्यांचेही आभार.
या शिबिरास श्री. सचिनदादापाटील, श्री. अभिषेकदादा ठाकुर, श्री. राजेशदादा भोईर,सौ. प्रियंकाताई सावंत,श्री. चेतनदादा पाटील, सौ. विनया कदम, श्री. अजित माने, भाई सावंत, श्री. विलास मुळम,श्री. दादा धाडवे, विराज सुर्वे, श्री. देविदास तटकरे , रोहित भायजे यांनी या मोफत आरोग्य आणि चष्मे वाटप शिबिरास भेट देऊन श्री. संभाजीदादा जाधव यांना सदिच्छा दिल्या.एकंदरीत हे आरोग्य शिबिर खूप मोठ्या प्रमाणावर यशस्वी झाले .