Breaking
ब्रेकिंग

महापरिनिर्वाण दिनानिमित्त ठाणे महापालिकेच्यावतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन..

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे (०६) :ठाणे महानगरपालिकेच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोर्ट नाका येथील त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी अभिवादन केले. त्यावेळी, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त शंकर पाटोळे आणि सहाय्यक आयुक्त सोपान भाईक उपस्थित होते.

त्याचबरोबर, महापालिका मुख्यालयातील पत्रकार कक्ष येथेही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी, आयुक्त सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद काबंळे, उपायुक्त मनीष जोशी, उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, पत्रकार संघाचे पदाधिकारी, पत्रकार आदी उपस्थित होते.

तसेच, ठाणे रेल्वे स्टेशन येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास उपायुक्त उमेश बिरारी, उपायुक्त शंकर पाटोळे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. त्याप्रसंगी, सहाय्यक आयुक्त सोपान भाईक, महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

ठाणे महापालिका मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले. त्याप्रसंगी, अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, माहिती व जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर यांच्यासह ठाणे महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे