Breaking
ब्रेकिंग

ठाण्यातील एका रिक्षा चालकाचा प्रामाणिकपणा,रोकड असलेली बॅग प्रवाशाला परत…

अमित जाधव - संपादक

0 2 0 9 7 4

ठाणे..बँक कर्मचारी असलेल्या एका प्रवाशाची महत्त्वाचे कागदपत्रांची बॅग व रोख रक्कम रिक्षात विसरली होती. मात्र चालकाने प्रामाणिकपणा दाखवत पैसे व बॅग प्रवाशाला परत केली आहे. धोंडीराम मोरे असे या प्रामाणिक रिक्षाचालकाचे नाव असून त्याचे अभिनंदन करण्यात येत आहे.

धोंडीराम मोरे हे गणेशवाडी येथील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे शाखाप्रमुखदेखील आहेत. ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह रिक्षा चालवून करतात. आज सकाळी एका प्रवाशाची बॅग रिक्षात विसरल्याचे दिसून आले. त्यात काही महत्त्वाची कागदपत्रे व पैसेही होते. धोंडीराम मोरे यांनी त्वरित नौपाडा पोलीस ठाणे गाठून रिक्षात विसरलेला ऐवज पोलिसांच्या ताब्यात दिला. प्रवासी गोपीनाथ मयेकर यांना या साऱ्या वस्तू प्रामाणिकपणे परत देण्यात आल्या. त्यात हवालदार महेश महाले, प्रवीण साखरे, रोकडे यांच्यासह विभागप्रमुख जिवाजी कदम यांनी मोलाची भूमिका बजावली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Amit Jadhav

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 2 0 9 7 4

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे